शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कातच

By admin | Updated: October 17, 2015 03:21 IST

शिवसेनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात दसरा मेळावा दादर येथील शिवाजी पार्कवर होण्याचा मार्ग मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाने मोकळा झाला आहे

मुंबई : शिवसेनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात दसरा मेळावा दादर येथील शिवाजी पार्कवर होण्याचा मार्ग मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाने मोकळा झाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेला मैदान देण्यास विरोध केला मात्र न्यायालयाने तो फेटाळला. शिवसेनेचे विभागप्रमुख व आमदार अ‍ॅड. अनिल परब यांनी निकालाबाबत समाधान व्यक्त करताना मनसेच्या भूमिकेवर टीका केली.सार्वजनिक मैदानांवर जाहीर सभा, धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यास न्यायालयाने विरोध केला होता. त्यातून मार्ग काढण्याकरिता सरकारने एमआरटीपी कायद्याच्या कलम ३७ (अ) कलमात बदल केला व खेळांव्यतिरिक्तचे दिवस ३० दिवसांवरून ४५ दिवस असे वाढवले. या ४५ दिवसांचे वाटप कसे करणार त्याचा निर्णय सरकारने अर्ज मागवून १ नोव्हेंबरच्या दरम्यान करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. राज्यातील भाजपा प्रणीत सरकारने मागील वर्षीच्या १ नोव्हेंबर रोजी हे दिवस निश्चित करण्याची प्रक्रिया पार पाडली नव्हती. त्या वेळी ३१ आॅक्टोबर रोजी राज्यात सरकार स्थापन झाले व त्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला नव्हता. त्यामुळे ही प्रक्रिया पार पाडणे शक्य झाले नाही. मात्र शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकरिता त्या ४५ दिवसांतील एक दिवस देणे शक्य आहे, असे राज्य सरकारने न्यायालयात स्पष्ट केले. मात्र मनसेने न्यायालयात अर्ज करून आम्हाला शिवाजी पार्क मैदान नाकारण्यात आले होते. त्यामुळे सर्वांना समान न्याय हे तत्त्व धाब्यावर बसवले गेले, असा दावा केला. मात्र मनसेची विनंती अमान्य करताना शिवसेनेला मैदान देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. (विशेष प्रतिनिधी)शिवसेनेला आपल्या दसरा मेळाव्याकरिता शिवाजी पार्क मैदान मिळाले ही निश्चित आनंदाची घटना असून, शिवसेना मोठ्या उत्साहात हा मेळावा साजरा करील. मात्र मनसेने शिवसेनेला मैदान मिळू नये याकरिता अर्ज करून कोत्या मनोवृत्तीचे दर्शन घडवले.- अ‍ॅड. अनिल परब, आमदार