शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

शिवसेनेच्या बाणात उरला नाही ताण !

By admin | Updated: June 18, 2016 00:45 IST

एकेकाळी शिवसेनेने विदर्भात बऱ्यापैकी पताका रोवली होती. मात्र, गेल्या दहा वर्षात सेनेचे बरेच गड गडगडले आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपशी असलेल्या युतीच्या बळावर सेनेला विदर्भातून आपले

- कमलेश वानखेडे (विदर्भ)एकेकाळी शिवसेनेने विदर्भात बऱ्यापैकी पताका रोवली होती. मात्र, गेल्या दहा वर्षात सेनेचे बरेच गड गडगडले आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपशी असलेल्या युतीच्या बळावर सेनेला विदर्भातून आपले चार खासदार दिल्लीत पाठविला आले. मात्र, विधानसभा निवडणुकीत भाजपशी फारकत होताच सेनेची डरकाळी पोकळ असल्याचे स्पष्ट झाले. भाजपने ६२ पैकी ४४ जागा जिंकल्या, तर शिवसेनेला फक्त चार जागा जिंकता आल्या. भाजपचे नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्राबल्य असलेल्या पूर्व विदर्भात तर बाळू धानोरकर (वरोरा, जि. चंद्रपूर) यांच्या रूपात एकच बाण निशाण्यावर लागला. विदर्भाचे एकूणच राजकीय चित्र पाहिले तर धनुष्याला भाजपच्या दोरीचा ताण मिळाला तरच सेनेचा बाण नेम धरतो, अशी परिस्थिती आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप व शिवसेनेला मिळालेल्या मतांचा हिशेब केला तर लोकसभेत युती नसती तर सेनेचा एकही खासदार निवडून आला नसता हे सेनेला आरसा दाखविणारे वास्तव समोर येते. गडकरी-फडणवीस यांच्या तुलनेत विदर्भात सेनेकडे मोठा चेहरा नाही. खा. भावना गवळी, खा. प्रतापराव जाधव, खा. कृपाल तुमाने हे मतदारसंघापुरते मर्यादित आहेत. आमदारांचेही तेच. राज्यमंत्री संजय राठोड वगळता बाळू धानोरकर (वरोरा, जि. चंद्रपूर), संजय रायमुलकर (मेहकर, बुलडाणा) व शशिकांत खेडेकर (सिंदखेडराजा, बुलडाणा) हे त्यांचा गृहजिल्हाही एकहाती सांभाळण्यास सक्षम नाहीत. अमरावती, गोंदिया, भंडाऱ्यात शिवसेनेचा एकही आमदार नाही. यवतमाळमध्ये भावना गवळी व पालकमंत्री संजय राठोड एकतर्फी किल्ला लढवित आहेत. अकोला, बुलडाणा व वाशिम असे तीन जिल्ह्यांचे पश्चिम वऱ्हाड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्रामध्ये शिवसेनेची पाळेमुळे झपाट्याने वाढली. भाजपाशी युती केल्यानंतर सुरू झालेली सेनेची फरपट आता घुसमटीत रूपांतरित झाली आहे. विदर्भ विरोधामुळे सेनेला खीळपश्चिम महाराष्ट्राकडून विदर्भावर अन्याय झाला, अशी विदर्भातील जनतेची भावना आहे. त्यातूनच वेगळ्या विदर्भाच्या मागणीला पाठबळ मिळते आहे. सेनेची भूमिका कायमस्वरुपी वेगळ्या विदर्भाच्या विरोधात राहिली आहे. त्यामुळे सेनेला विदर्भात भावनिक पाठबळ मिळविता आलेले नाही. याचा फटका पक्ष विस्ताराला बसला. अशी आहे विदर्भातील शिवसेनाविदर्भात शिवसेनेकडे मोठा चेहरा नाहीचार खासदार, तेही युतीच्या बळावर चारच आमदार, पूर्व विदर्भात तर एकच चंद्रपूर, यवतमाळ व बुलडाणा वगळता उर्वरित आठ जिल्ह्यांमध्ये एकही आमदार नाहीखासदार व आमदारांचा मतदारसंघाबाहेर फारसा प्रभाव नाही प्रत्येक जिल्ह्यात गटबाजीमुळे खिंडार नेते भाजपच्या संपर्कात. पालिका व जि.प.मध्येही भाजपच्या साथीनेच सत्ता