शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

वर्सोव्यात वर्चस्वासाठी शिवसेनेची रणनीती

By admin | Updated: July 21, 2016 02:45 IST

मुंबई महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत.

मनोहर कुंभेजकर,

मुंबई- मुंबई महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. शिवसेनेने वर्सोवा विधानसभा मतदार संघात आगेकूच करण्यासाठी रणनीती आखली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विधानसभेच्या उमेदवार राजुल पटेल यांचा निवडणूक अर्ज निवडणूक आयोगाने रद्द केला होता. माजी आमदार बलदेव खोसा यांच्यावर असलेली मतदारांची नाराजी, मोदी लाट आणि निवडणुकीत शिवसेना उभी राहिली नसल्यामुळे वर्सोवा विधानसभा मतदार संघातून भाजपाच्या आमदार म्हणून डॉ.भारती लव्हेकर या २६ हजारांहून अधिक मतांनी निवडून आल्या. मात्र आगामी पालिका निवडणुक ही शिवसेना आणि भाजपच्या अस्तित्वाची लढाई आहे. पालिका निवडणुकीत आपले वर्चस्व राखण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. खासदार गजानन कीर्तिकर, विभागप्रमुख-आमदार डॉ.अनिल परब आणि महिला विभागसंघटक राजुल पटेल यांनी या मतदार संघावर लक्ष केंद्रीत केले आहे. डॉ.अनिल परब आणि राजुल पटेल या अनुभवी नेत्यांनी येथील प्रत्येक शाखांना भेटी देऊन शिवसैनिक, ज्येष्ठ शिवसैनिक आणि गटप्रमुख यांच्याशी सविस्तर चर्चा करून येथील मतदार संघाचा सविस्तर आढावा नुकताच पूर्ण केला. वर्सोवा विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी दिवसरात्र मेहनत करून आगामी पालिका निवडणुकीला सज्ज राहा, असे आदेश त्यांनी येथील शिवसैनिकांना दिले आहेत.याच रणनीतीचा भाग म्हणून रविवार, २४ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता अंधेरी (प) येथील शहाजी राजे क्रीडा संकुलात (स्पोटर््स कॉम्प्लेक्स) मध्ये येथील ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार सोहळा शिवसेना शाखा क्र ५५, ५६, ५९ यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला आहे. स्थायी समिती अध्यक्ष यशोधर (शैलेश) फणसे यांच्या पुढाकाराने उपविभागप्रमुख राजेश शेट्ये आणि महिला उपविभाग संघटक शीतल सावंत यांनी हे आयोजन केलेले आहे. खासदार गजानन कीर्तिकर, डॉ.अनिल परब आणि राजुल पटेल आदी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ शिवसैनिकांचा आदर्श घेऊन तरुण पिढीतील शिवसैनिकांना विभागात काम करण्याची प्रेरणा मिळावी, म्हणून येथील गटप्रमुखांच्या मेळाव्याचे आयोजन केल्याची माहिती शेट्ये यांनी दिली. सोहळ््यासाठी शाखाप्रमुख सुधाकर अहिरे, सूर्यकांत खवळे, अनिल राऊत, महिला शाखासंघटक जागृती भानजी, रंजना हरळीकर आणि बेबीताई पाटील सक्रिय आहेत. तळागाळातील कार्यकर्त्यांची नाराजी राहू नये, अन्यथा हे निवडणुकीत त्रासदायक ठरु शकते, याचा अंदाज घेऊनच अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे शिवसेनेच्या एका ज्येष्ठ कार्यकर्त्याने ‘लोकमत’ला सांगितले.