शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या सोशल बदनामीमागे शिवसेना

By admin | Updated: November 19, 2014 10:14 IST

सोशल मीडियातून भाजपाची बदनामी करण्याचे काम शिवसेनेचे कार्यकर्तेच करीत असल्याची माहिती सायबर क्राईमने दिल्याचा गौप्यस्फोट राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केला आहे.

अतुल कुलकर्णी, मुंबई विधानसभेत आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर भाजपाने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतल्याचे सांगत सोशल मीडियातून भाजपाची बदनामी करण्याचे काम शिवसेनेचे कार्यकर्तेच करीत असल्याची माहिती सायबर क्राईमने दिल्याचा गौप्यस्फोट राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपा एकत्र येण्याच्या चर्चेला वेगळे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर फेसबुक, व्हॉटस् अ‍ॅप, इमेलचा वापर करीत भाजपावर टीकेची झोड उठवण्यात आली. कमळाच्या चिन्हात राष्ट्रवादीचे घड्याळ जोडण्यापासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांचे चेहरे लावून तयार केलेल्या व्यंगचित्रांपर्यंत एकच धुमाकूळ घातला. सी-सॉसारख्या खेळण्यावर एका बाजूला शरद पवार स्वत:चे वजन टाकून उभे आहेत आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला उंचावर नरेंद्र मोदी असल्याचे कार्टूनदेखील गाजले. मात्र या अशा बदनामीने अस्वस्थ झालेल्या फडणवीस यांनी एका बैठकीत हा विषय काढला. त्यावर शेजारीच बसलेल्या सायबर क्राईमच्या अधिकाऱ्यांना या सगळ्याची चौकशी करण्याचे आदेश दिले गेले.चर्चा झाली...याबाबत खडसे म्हणाले, अशी चर्चा झाली हे खरे आहे. पोलीस अधिकाऱ्यांनीदेखील, हे असले मेसेज कोणत्या कॉम्प्युटरवरून जनरेट झाले, याच्या तांत्रिक बाजू तपासून पाहिल्या. यातील ९० टक्के माहिती शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून टाकल्याचे समोर आले. आम्ही राष्ट्रवादीला पाठिंबा मागितला नव्हता आणि आवाजी मतदानाने तो मंजूर केला गेला, असे ते म्हणाले. मात्र या बातमीने भाजपा-शिवसेना एकत्र येण्यास अडसर होऊ शकतो, असे सांगितले जात आहे.