शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
3
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
4
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
5
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
6
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
7
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
8
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
9
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
10
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
11
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
12
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
13
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
14
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
15
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
16
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
17
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
18
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
19
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
20
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा

शिवसेनेचे घूमजाव

By admin | Updated: June 21, 2017 03:24 IST

केवळ दलित समाजाची मते मिंळविण्यासाठी राष्ट्रपतिपदासाठी दलित चेहरा पुढे करण्यात आला असेल, तर त्यात आम्हाला रस नाही, अशा शब्दांत भाजपाला फटकारणाऱ्या उद्धव ठाकरे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : केवळ दलित समाजाची मते मिंळविण्यासाठी राष्ट्रपतिपदासाठी दलित चेहरा पुढे करण्यात आला असेल, तर त्यात आम्हाला रस नाही, अशा शब्दांत भाजपाला फटकारणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी २४ तासांत घूमजाव केले आहे. राष्ट्रपतिपदासाठीचे भाजपा उमेदवार रामनाथ कोविंद यांना शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. मंगळवारी शिवसेना नेत्यांच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी ही माहिती दिली.राष्ट्रपतिपदासाठी भाजपाने रामनाथ कोविंद यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर, शिवसेनेने याबाबत स्पष्ट भूमिका घेतली नव्हती. उलट षण्मुखानंद येथील शिवसेना वर्धापन दिनाच्या मेळाव्यात कोविंद यांच्या उमेदवारीवर नाराजी व्यक्त केली होती. दलित मतांवर डोळा ठेऊन दलित उमेदवार पुढे केला जात असल्याचे सांगत मंगळवारी शिवसेना नेत्यांच्या बैठकीनंतर निर्णय घेणार असल्याचे उद्धव यांनी मेळाव्यात सांगितले होते. त्याप्रमाणे, मंगळवारी सायंकाळी मातोश्रीवर शिवसेना नेत्यांची बैठक झाली. त्यात कोविंद यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. कायम भाजपाला विरोध करावा, अशी काही शिवसेनेची भूमिका नाही. जे पटते, तिथे पाठिंबा देतो आणि जे पटत नाही, तिथे विरोध स्पष्टपणे करतो, असे सांगत ठाकरे यांनी सारवासारव केली. काँग्रेस व अन्य विरोधी पक्ष ज्या नावांची चर्चा करत आहेत, त्या फक्त चर्चाच आहेत. त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्यात काहीही अर्थ नाही, तोवर निवडणूक होऊन जाईल, असे ते म्हणाले. रामनाथ कोविंद हे एनडीएने पुढे केलेले चांगले नाव आहे. ते देशासाठी चांगले काम करतील, देशहिताचे निर्णय घेतील, अशी आशा आम्हाला आहे. शिवसेना नेत्यांशी चर्चा करूनच आम्ही त्यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. खरे तर देशहितासाठी आम्ही मोहन भागवत यांच्या नावाला पहिली पसंती दिली होती. ही पसंती आजही कायम आहे. मात्र, ते राष्ट्रपतिपदाच्या चर्चेत नाहीत, तसेच शेतकऱ्यांचे हित व्हावे, म्हणून स्वामिनाथन यांच्या नावाला दुसरी पसंती दर्शवली होती. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत झालेल्या चर्चेत आम्ही स्वामिनाथन यांचे नावही सांगितले होते. मात्र, स्वामिनाथन यांना प्रकृतीच्या कारणास्तव उमेदवार करणे शक्य नाही, असे शहा यांनी स्पष्ट केले. त्यामुळे भाजपाने जे तिसरे नाव जाहीर केले, त्याला आम्ही पाठिंबा दिला आहे, असे ठाकरे यांनी सांगितले.