शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
4
बेपर्वाईने गाडी चालवणे आत्ताच थांबवा, मृत्यू झाल्यास नातेवाईकांना इन्शुरन्सचा एकही रुपया मिळणार नाही!
5
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
6
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
7
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
8
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
9
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
10
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
11
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
12
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
13
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
14
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
15
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
16
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
17
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
18
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
19
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
20
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!

शिवसेना प्रादेशिक पक्षांचा बाप, मोदींना विजयसभेचे निमंत्रण - उद्धव ठाकरे

By admin | Updated: February 12, 2017 08:26 IST

शिवसेना हा देशातील सर्व प्रादेशिक पक्षांची बाप आहे. मोदीना मी अत्यंत्य विनम्रपणे निमंत्रण देतोय. 23 फेब्रुवारीला होणाऱ्या सेनेच्या विजयी

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 12 -  शिवसेना ही देशातील सर्व प्रादेशिक पक्षांची बाप आहे. देशातील इतर प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय पक्षांना पर्याय ठरू शकतात तर शिवसेनाही महाराष्ट्रात ते करू शकते. भाजपाने कितीही जोर लावला. मोदींची सभा घेतली ती मुंबई महानगरपालिकेत पुन्हा एकदा शिवसेनेचाच विजय होणार आहे. त्यामुळे 23 फेब्रुवारीला होणाऱ्या विजयी जल्लोशात सहभागी होण्याचे आमंत्रण मी मोदींनी देतोय, अशा शेलक्या शब्दात उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समाचार घेतला.  
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाला दिलेल्या मॅरेथॉन मुलाखतीमधील शेवटच्या भागात उद्धव ठाकरे यांनी भाजपावर पुन्हा एकदा घणाघात केला. यावेळी नोटाबंदी, दहशतवाद, शिवस्मारक, डॉ. आंबेडकरांचे स्मारक अशा विविध मुद्यांवरून उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर टीका केली. यावेळी राष्ट्रीय पक्षांना प्रादेशिक पक्ष पर्याय ठरतात असे सांगत महाराष्ट्रात ते काम शिवसेना करेल अशा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले. "देशात ज्या ज्या राज्यात समर्थ पर्याय उभा राहिलाय. तिथे जनतेने राष्ट्रीय पक्षांना नाकारून प्रादेशिक पक्षांना साथ दिली आहे. मग असे महाराष्ट्रात का होऊ शकत नाही,  अशा प्रादेशिक पक्षांमध्ये शिवसेना ही सर्वात जुनी आहे. त्यादृष्टीने शिवसेना प्रादेशिक पक्षांची बाप आहे. युतीमध्ये आमची 25 वर्षे सडली या मतावर मी अद्याप ठाम आहे.  युतीमुळे फसगत झाल्याची भावना आहे.  भाजपाबरोबरची युती तो़डणाऱ्या प्रादेशिक पक्षांचा फायदा झालाय. प्रादेशिक अस्मिता आणि स्वत:ला न्याय देणारा पक्ष आवडतो."
या मुलाखतीती उद्धव यांनी भाजपा आणि मोदींनाही पुन्हा लक्ष्य केले. ते म्हणाले, " पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभा घेतल्या तरी मुंबईत शिवसेनेचाच विजय होणार आहे. त्यामुळे मोदींनी मुंबईत प्रचारसभा घेतलीच तर शिवसैनिक मोदींना भेटून त्यांना 23 तारखेच्या विजयसभेचे निमंत्रण देतील."