शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना, मनसे, भाजपाचे 'Selfish' पॉईंट

By admin | Updated: March 4, 2017 01:48 IST

शिवाजी पार्क मैदानातील सेल्फी पॉईंटवरुन रंगलेल्या राजकारणात अखेर मुंबई महापालिकेने सर्वमान्य तोडगा काढला आहे.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 3 - दादर, शिवाजी पार्कवरील ‘सेल्फी पॉइंट’वरून सुरू असलेले राजकारण मिटवण्यासाठी महापालिकेनेच आज पुढाकार घेतला. मनसे, शिवसेना आणि भाजपाला ‘सेल्फी पॉइंट’साठी स्वतंत्र जागा देऊन, या वादाचा सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला. यामुळे ‘सेल्फिश’ राजकारण करणाऱ्या राजकीय पक्षांचाही नाईलाज होऊन या वादावर पडदा पडला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने या ठिकाणी ‘स्टडी पॉइंट’ची मागणी केल्याने या चर्चेला नवे वळण मिळाले आहे. 

महिलांसाठी आरक्षित दादर, शिवाजी पार्क प्रभागात आपल्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवणाऱ्या संदीप देशपांडे यांना हा पराभव जिव्हारी लागला. यामुळे त्यांनी शिवाजी पार्क येथील सेल्फी पॉइंट बंद करण्याची घोषणा केली. मात्र, यावरून चांगलेच राजकारण तापले. भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आपण ‘सेल्फी पॉइंट’ आणखी आकर्षक करणार असल्याचे ‘टिष्ट्वट’ करून जाहीर केले, तर शिवसेनेच्या नगरसेविका विशाखा राऊत यांनी नवीन कलाकृतींसह ‘सेल्फी पॉइंट’ सुशोभित करणार असल्याचे जागोजागी फलक लावले. यामुळे मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी तत्काळ दखल घेऊन, ‘सेल्फी पॉइंट’ पुन्हा सुरू करण्याचे आदेश देशपांडे यांना दिले. तोपर्यंत भाजपाने आयुक्तांमार्फत ‘सेल्फी पॉइंट’ बनविण्याची परवानगी मिळवली. या ‘सेल्फिश’ घडामोडींची दखल घेऊन जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त रमाकांत बिरादार यांनी दादरमधील ‘सेल्फी पॉइंट’च्या वादावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी मनसे, शिवसेना आणि भाजपा या पक्षांची बैठक बोलावली. या बैठकीत तिन्ही पक्षांना ‘सेल्फी पॉइंट’साठी परवानगी देण्यात आली आहे. यामुळे शिवाजी पार्क परिसराला, यापुढे ‘सेल्फी पॉइंट’चा वेढा पडल्याचे पाहायला मिळणार आहे. प्रत्येक पक्षाने ५० फुटांच्या अंतरावर ‘सेल्फी पॉइंट’ उभारा, अशी सूचना पालिका प्रशासनाने या सर्व राजकीय पक्षांना केली आहे. येथे असतील ‘सेल्फी पॉइंट’शिवाजी पार्कवर मनसेच्या मूळ जागेतच ‘सेल्फी पॉइंट’ सुरू ठेवता येईल, तर भाजपाला त्यापासून थोड्या अंतरावर जागा देण्यात येणार आहे. शिवसेनेला स्काउट पेव्हेलियनच्या बाहेर जागा देण्यात आली आहे. 

 आणखी वाचा 
 
आपण या स्पर्धेत मागे पडू नये म्हणून मग  शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका विशाखा राऊत यांनी फलकबाजी करत सेल्फी पॉइंट उभारण्याची घोषणा केली. तो पर्यंत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने सेल्फी पॉईंट सुरु करण्यात येत असल्याचा फलक लागले होते. तरुणाईला आकर्षित करण्यासाठी तिन्ही पक्षांनी सुरु केलेले हे सेल्फीश राजकारण हातघाईवर येऊ नये यासाठी अखेर पालिकेने तिघांना 50 फुटाच्या अंतराने सेल्फी पॉईंट उभारण्यासाठी जागा देण्याचा निर्णय घेतला. 
 
स्टडी पॉईंट उभारण्याची परवानगी द्या - राष्ट्रवादीचीही उडी
दरम्यान ' सेल्फी पॉईंट'च्या या वादात आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही उडी मारली आहे. शिवसेना, मनसे आणि भाजपा सेल्फी पॉईंटच्या जागेसाठी लढत असताना राष्ट्रवादीवे तिथे ' स्टडी पॉईंट उभारण्याची' घोषणा करत त्यासाठी परवानगी मागितली आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी हा पॉईंट उभारण्यात येईल, असे राष्ट्रवादीतर्फे सांगण्यात आले आहे.