शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना नगरसेवक गायकवाडला अटक

By admin | Updated: April 3, 2017 04:28 IST

प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड याला नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे अटक केली

कल्याण : शहराच्या पूर्व भागातील शिवसेना नगरसेविका माधुरी काळे यांचे पती प्रशांत यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड याला नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे अटक केली आहे. काळे यांच्यावर हल्ला झाला, तेव्हा काळे यांनी शिवसेनेचे उपशहरप्रमुख संजय गायकवाड यांच्यावर संशय व्यक्त केला होता. काळे व गायकवाड यांच्यात वाद असल्याने काळे यांनी गायकवाड यांनीच हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला होता. एका ठिकाणी गायकवाड यांनी काळे यांना पाहून घेण्याची धमकी दिली होती. ही गोष्ट महेशला माहीत होती. महेश व काळे हे मित्र आहेत, तर संजय गायकवाड याचे महेश व काळे या दोघांशी पटत नाही. काळे यांच्यावरील हल्ला सीसीटीव्हीत कैद झाला होता. पोलीस तपास करत असताना वेगळीच गोष्ट समोर आली. महेश याच्याकडे कामाला असलेल्या प्रशांत बोटे यांनी काळेवर हल्ला केला आहे. बोटेने हा हल्ला महेशच्या सांगण्यावरून केल्याची माहिती प्राथमिक तपासात उघड झाली. पोलिसांनी प्रथम बोटे याला अटक केली. महेशच्या सांगण्यावरूनच काळेंवर जीवघेणा हल्ला केला, अशी कबुली बोटे याने दिली. काळे यांचा काट्याने काटा काढण्याचा प्रयत्न महेश याने केला. त्याचा तो प्रयत्न फसला. काळेवर हल्ला केला, तर काळे संजय गायकवाडचे नाव घेईल. त्यामुळे हल्ला महेशने केला, हे उघड होणार नाही. मात्र, महेशचा हा प्रयत्न फसला. महेशला अटक झाल्याने काळे यांना धक्का बसला आहे. महेशने त्यांच्या हत्येचा कट रचला होता. दरम्यान, महासभेच्या वेळी झालेल्या राडाप्रकरणी महेश याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (प्रतिनिधी)