शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या खेळीने शिवसेना गोंधळलेली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2016 03:56 IST

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोला मंजुरी देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवली, उल्हासनगर आणि कळवा, मुंब्रा आणि दिव्याला या सेवेतून वगळले.

डोंबिवली : ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोला मंजुरी देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवली, उल्हासनगर आणि कळवा, मुंब्रा आणि दिव्याला या सेवेतून वगळले. त्यामुळे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी फडणवीस यांना साकडे घातले. प्रत्यक्षात खरेच त्यांनी डोंबिवलीत मेट्रोला हिरवा कंदील दिला आहे का, याबाबत त्यांच्याकडून कोणतीच माहिती समोर आलेली नाही. मुख्यमंत्र्यांच्या या खेळीमुळे शिवसेनेची अवस्था गोंधळल्यासारखी झाल्याची टीका मनसेचे प्रदेश सरचिटणीस राजू पाटील यांनी केली. मनसेने डोंबिवली मेट्रोची मागणी केल्यावर डॉ. शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर तातडीने ठाण्यात पत्रकार परिषद घेत त्याबद्दलची माहिती दिली. मात्र, काही मुद्दे सांगायचे राहून गेल्याचे सांगत त्यांनी पुन्हा कल्याणला पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी ठाणे पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेट्रोला मुंब्रा, कळवा-दिवा जोडण्याचा प्रयत्न केला. त्याचे सादरीकरण एमएमआरडीएकडे केले. या प्रकाराला गोंधळ नाहीतर अजून काय म्हणावे, असा सवाल पाटील यांनी केला. त्यांनी दिलेल्या कल्याण-शीळ उन्नत मार्गाच्या आश्वासनाचे काय, मध्यंतरी कल्याण-शीळ रोडवर अंडरपासची संकल्पना आणली, त्याचे काय? उद्या अजून कोणी सेनेतून पुढे येऊन नवीन मेट्रो मार्गाची मागणी करेल, सर्वांना प्रत्येकाच्या दारातून मेट्रो गेली पाहिजे असेही वाटेल. परस्पर विरोधी प्रतिक्रिया द्यायला सांगून मनसेने केलेल्या डोंबिवली मेट्रो मागणीबाबत लोकांमध्ये गोंधळ तयार करण्यासाठी ठाण्याहून बोलते केलेले हे पोपट आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.