शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शिवस्मारक हे जगात ओळख बनेल - मुख्यमंत्री

By admin | Updated: December 25, 2016 03:02 IST

‘स्टॅच्यू आॅफ लिबर्टी’ ही जशी अमेरिकेची ओळख आहे तसे, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक ही महाराष्ट्र आणि देशाची ओळख जगात बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र

मुंबई : ‘स्टॅच्यू आॅफ लिबर्टी’ ही जशी अमेरिकेची ओळख आहे तसे, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक ही महाराष्ट्र आणि देशाची ओळख जगात बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्यक्त केला. वांद्रे-कुर्ला संकुलाच्या एमएमआरडीए मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुख्य उपस्थितीत आयोजित सभेमध्ये ते बोलत होते. अठरापगड जातींचे मावळे सोबत घेऊन शिवाजी महाराज मुगलांवर तुटून पडले होते. अशाच सामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून राज्याचा विकास आपले सरकार करीत असून ज्या छत्रपतींच्या आशीर्वादाने आम्हाला सत्ता मिळाली त्यांचे आम्ही सेवक आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले. जो देश आपला इतिहास विसरतो त्याला वर्तमान तर असू शकतो मात्र, भविष्य असू शकत नाही, या शब्दांत शिवस्मारकाच्या उभारणीचे जोरदार समर्थन मुख्यमंत्र्यांनी केले. शूरता, नम्रता, प्रशासकीय कौशल्य असे अनेकविध गुण असलेले शिवाजी महाराज हे आमची प्रेरणा आहेत. आम्ही कोणीही ‘शिवा’ होऊ शकत नाही पण ‘जिवा’ (जिवा महाला) होण्याची संधी द्यावी, अशी प्रार्थना मी आई तुळजाभवानीच्या चरणी करतो, असे भावपूर्ण उद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. भूूमिपूजन होत असलेल्या मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे सामान्य माणसांचे जीवन सुखकर होईल. असे सांगून या प्रकल्पांसाठी केंद्र सरकारच्या विविध परवानग्या तत्काळ दिल्याबद्दल पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचे त्यांनी आभार मानले. किल्ल्यांचा विकास करू -उद्धवशिवरायांचे नाव घेताच मुडदाच काय पण दगडही उभे राहतील. ते महाराष्ट्राचे दैवत होते आणि आहेत. त्यांचे भव्य स्मारक उभारणे हे येऱ्यागबाळ्याचे काम नव्हते. सरकारमध्ये आम्ही सोबत आहोत आणि जगाला प्रेरणा मिळेल, असे हे स्मारक उभे राहील, अशा माझ्या शुभेच्छा आहेत. महाराष्ट्रातील गडकिल्ले केंद्रीय पुरातत्व विभागापासून मुक्त करून राज्य शासनाकडे द्या, अशी माझी पंतप्रधान मोदींकडे मागणी आहे. असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि नौसेनेकडे असलेली सुमारे ९०० एकर जागा वापरात नाही. त्या ठिकाणी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान करणाऱ्यांचे संग्रहालय व्हायला हवे, असेही त्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)शिवसैनिकांची धरपकडशिवसेनेचे पक्षप्रमुख स्वत: पंतप्रधानांसोबत शिवस्मारकाच्या सोहळ्यात सहभागी असतानाही शिवसैनिकांना अभय मिळाले नाही. हा सोहळा पाहण्यासाठी गिरगाव चौपाटीबाहेर गर्दी करणाऱ्या शिवसैनिकांच्या एका गटाला ताब्यात घेत पोलिसांच्या गाडीत कोंबण्यात आले. चौपाटीसमोरील दुकानंही बंद करण्यास भाग पाडण्यात आल्याने कोणत्याही गोंधळाविना हा सोहळा शांततेत पार पडला.पोलिसांची दमछाकचौपाटी फिरण्यासाठी आलेल्या अनेकांचा येथे आल्यावर पोलीस बंदोबस्त पाहून हिरमोड होत होता. त्यातही काही हौशी सोहळा अथवा मान्यवरांची एखादी झलक पाहण्यासाठी धडपडत होते. अशांना आवरताना पोलिसांचीमात्र पुरती दमछाक होत होती.