शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ राज्य परिषद उधळण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न

By admin | Updated: April 20, 2016 19:52 IST

अकोला येथे आयोजित परिषद शिवसैनिकांनी उधळण्याचा प्रयत्न केला.

 
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 20- माजी आमदार वामनराव चटप, माजी महाधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे आणि इतर विदर्भवादी नेत्यांच्या उपस्थितीत स्वतंत्र विदर्भाच्या चर्चेसाठी बुधवारी अकोला येथे आयोजित परिषद शिवसैनिकांनी उधळण्याचा प्रयत्न केला. यावेळी जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीहल्ला करावा लागला.
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने २0 एप्रिल रोजी अकोल्यातील प्रमिलाताई ओक सभागृहात विदर्भ राज्य परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. आजपर्यंत विदर्भावर झालेला अन्याय, रखडलेला विकास, विदर्भ विकासाकडे झालेले दुर्लक्ष, वाढलेली बेरोजगारी, शेतकºयांच्या आत्महत्या, शेती सिंचनाचा अनुशेष, विजेचा प्रश्न, दुष्काळ आदी विषयांवर अभ्यासपूर्ण चर्चा करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी सुरू करण्यात येणाºया आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आयोजित या परिषदेमध्ये माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्यासह विदर्भवादी नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. ही परिषद सुरू असताना शिवसेनेचे निवासी उपजिल्हाप्रमुख राजेश मिश्रा आणि शहरप्रमुख तरूण बगेरे यांच्यासह १0 ते १२ शिवसैनिक ‘जयभवानी, जय शिवाजी’च्या घोषणा देत सभागृहाजवळ आले. त्यांनी सभागृहात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला; मात्र आयोजकांनी सभागृहाचा दरवाजा बंद करून घेतल्याने त्यांना आत जाता आले नाही. या प्रकाराने परिषदस्थळी काही काळासाठी गोंधळ झाला होता. पोलिसांनी जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला; मात्र शिवसैनिक पोलिसांना जुमानत नव्हते. त्यामुळे पोलिसांना त्यांच्यावर सौम्य लाठीहल्ला करावा लागला.