शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

किल्ले रायगडवर ‘शिवशाही’

By admin | Updated: May 30, 2016 04:54 IST

१७ व १८ जूनला तिथीनुसार महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा होणार

मुंबई : हिंदवी स्वराज्याची राजधानी ‘किल्ले रायगड’ येथे १७ व १८ जूनला तिथीनुसार महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा होणार असून, यावेळी हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा शिवशाही अवतरणार आहे. श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड यांच्या वतीने हा सोहळा दरवर्षीप्रमाणे शिवकालीन इतमामात व विधीप्रमाणे साजरा होईल.१९९५ सालापासून ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी तिथीप्रमाणे होत असलेल्या या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील तसेच राज्याबाहेरीलही हजारो शिवभक्तांचा सळसळता उत्साह यावेळी अनुभवायला मिळतो. या दोनदिवसीय सोहळ्याची सुरुवात ज्येष्ठ शुध्द द्वादशीला (१७ जून) शिर्काई देवीच्या पूजनाने होईल. याच दिवशी छत्रपती संभाजी महाराजांची जयंतीही साजरी करण्यात येणार असून, त्यानंतर गणेशपूजन व जगदीश्वर पूजन कार्यक्रम पार पडतील. त्याचप्रमाणे सायंकाळी महाराजांच्या उत्सवमूर्तीचे शिवभक्तांनी आणलेल्य विविध जिन्नस व मिष्टान्नांनी तुलादान करून त्याचे प्रसाद म्हणून वाटप केल्यानंतर रात्री सांस्कृतिक कार्यक्रम होतील. दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता गडावर ध्वजारोहण झाल्यानंतर शिवराज्याभिषेकाच्या मुख्य सोहळ्यास सुरुवात होईल. यावेळी वेदमंत्रांचा जप आणि वैदिक विधीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करून किल्ले रायगडावर पहिल्या शिवराज्याभिषेकाच्या स्मृती जागवल्या जातील. यानंतर राजदरबाद ते जगदीश्वराच्या मंदिरापर्यंत ढोलताशांच्या गजरात महाराजांची पालखी मिरवणूक निघेल. (प्रतिनिधी)>या सोहळ्यासाठी पहाटे ५ पूर्वी शिवराज्याभिषेकासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांनी शिवभक्तांना केले आहे. गडावर शिवभक्तांची गैरसोय टाळण्यासाठी समितीतर्फे दोन्ही दिवस न्याहरी, जेवण आणि चहापानाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे यावेळी रात्रभर रोप-वे सुरू राहणार आहे.>यामुळे शिवभक्तांची गैरसोय दूर होईल. शिवाय महाड एसटी डेपोमधून एसडी महामंडळाच्या वतीने अतिरिक्त बसेसही सोडण्यात येणार असल्याची माहिती समितीकडून मिळाली.