शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

शिवरायांचे नाव दिल्लीत गाजवायचेय

By admin | Updated: October 17, 2016 01:08 IST

छत्रपती शिवाजीमहाराज यांची जयंती धुमधडाक्यात साजरी करण्याचा मनोदय खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला.

पुणे : राजर्षी शाहूमहाराज यांच्या नावाने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवी दिल्ली येथे वसतिगृह उभारण्याचा आणि छत्रपती शिवाजीमहाराज यांची जयंती धुमधडाक्यात साजरी करण्याचा मनोदय खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला. शिवाजीमहाराज आणि राजर्षी शाहू यांचे नाव दिल्लीत गाजवायचे असल्याचे त्यांनी सांगितले. धोर्डे पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विविध क्षेत्रांतील नामवंतांना श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या व मेळघाटमधील आदिवासींसाठी काम करणाऱ्या डॉ. स्मिता व रवींद्र कोल्हे यांच्या हस्ते रविवारी गौरविण्यात आले. त्या वेळी महाराज बोलत होते. संयोजक राजेंद्र धोर्डे पाटील, विलासराव धोर्डे पाटील व्यासपीठावर होते. संभाजीराजे छत्रपती म्हणाले, शाहूमहाराजांनी सामाजिक चळवळीत काम केले. सर्वांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याचा मूलमंत्र त्यांनी दिला. त्यामुळे दिल्लीत वसतिगृह उभारावयाचे आहे. त्यासाठी सरकारकडून किंवा विकत जागा उपलब्ध करावयाची आहे. या कामासाठी पैसा नको तर केवळ साथ द्या.पुरस्कारार्थींपैकी सीताबाई गायकवाड यांनी सत्काराला उत्तर दिले. हणमंतराव गायकवाड यांनी आईच्या चांगल्या संस्कारांमुळे यशाची वाट सुकर झाल्याचे नमूद केले. केवळ ८ जणांना घेऊन सुरू केलेले काम आता राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचले असून ६५ हजार सहकारी कंपनीत काम करतात. यापुढच्या काळात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून उत्पादनवाढ करण्याचा प्रयोग राबविणार आहे. हर्षद निंबाळकर, आबासाहेब शिंदे, भरत शेट्टी, अंजली सिंगडे-राव यांनीही मनोगत व्यक्त केले. राजेंद्र धोर्डे पाटील यांनी प्रास्तविकात पुरस्कार देण्यामागील भूमिका विशद केली. रूपाली देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)>हे आहेत मानकरीहलाखीच्या परिस्थितीतून शिक्षण घेत हाऊसकीपिंग क्षेत्रात नाव कमाविलेले बीव्हीजी ग्रुपचे हणमंतराव व दत्तात्रय गायकवाड यांच्या मातोश्री सीताबाई गायकवाड आणि ज्येष्ठ विधिज्ञ हर्षद निंबाळकर यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. शाहू बँकेचे संस्थापक आबासाहेब शिंदे, मधुमेहाच्या विकाराच्या उपचाराबाबत वेगळे संशोधन केलेले डॉ. प्रमोद त्रिपाठी, उद्योजक भरत शेट्टी व कलाक्षेत्रातील अंजली सिंगडे राव यांना विशेष कार्य गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.>दरमहा चारशे रुपयांत कुटुंब चालविण्याचे अवघड आव्हान स्वीकारून मेळघाटाचा रस्ता निवडला. त्या वेळी डॉक्टर म्हणून माझा स्वीकारही तेथील लोकांनी केला नाही. परंतु वाघाशी दोन हात केल्यानंतर रक्तबंबाळ झालेल्या हरिरामवर चारशे टाके घालून उपचार केले, तो आज जिवंत आहे. त्यानंतरच तेथील लोकांनी माझा डॉक्टर म्हणून स्वीकार केला.- डॉ. कोल्हे