शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

शिवचैतन्य सोहळा : पहिला दिवा महाराजांच्या चरणी...मशालींच्या प्रकाशात उजळणार किल्ले रायगड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 03:17 IST

दिवाळी म्हणजे रांगोळी, रोषणाई, फराळ आणि फटाक्यांची आतषबाजी. परंतु, आज ज्यांच्या शौर्यामुळे महाराष्ट्रात दिवाळीचा जल्लोष होतो

मुंबई : दिवाळी म्हणजे रांगोळी, रोषणाई, फराळ आणि फटाक्यांची आतषबाजी. परंतु, आज ज्यांच्या शौर्यामुळे महाराष्ट्रात दिवाळीचा जल्लोष होतो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि असंख्य मावळ्यांचे बलिदान यांचा विसर पडत आहे. त्यासाठीच, ‘पहिला दिवा महाराजांच्या चरणी, त्यानंतर आपल्या घरी’ असे अवाहन करत हजारो शिवभक्त दिवाळीमध्ये स्वराज्याची राजधानी ‘किल्ले रायडग’ मशालींच्या प्रकाशामध्ये उजळवण्यास सज्ज झाले आहेत.दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड यांच्यावतीने ‘शिवचैतन्य’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी १५ आॅक्टोबरच्या मध्यरात्री शिवराज्याभिषेक सोहळ्याला झालेल्या वर्षाइतके मशाली प्रज्वलीत करुन किल्ले रायगडचा परिसर उजळविण्यात येणार असल्याची माहिती, आयोजकांनी दिली.यंदाचे सहावे वर्ष असलेल्या या सोहळ्यादरम्यान एक व्यक्ती एक मशाल याप्रमाणे तब्बल ३४५ मशाली प्रज्वलीत करण्यात येतील. तसेच, मशालींच्या उजेडामध्ये महाराजांची पालखी मिरवणूकही निघेल.या दिमाखदार सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित राहणार असून सर्वांच्या एकवेळच्या जेवणाची व न्याहरीची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात येणार आहे. १५ आॅक्टोबरला रात्री ८ वाजता पालखी मिरवणूकीनंतर मशाली प्रज्वलीत करण्यात येणार असून रात्री ११ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम रंगतील.तसेच, १६ आॅक्टोबरला पहाटे गडदेवता पूजन, दिपोत्सव झाल्यानंतर गडावर फराळ वाटप कार्यक्रमहोईल. या सोहळ्यासाठी जास्तीत जास्त शिवभक्तांनी पारंपारिक वेशभूषेमध्ये उपस्थित रहावे,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

टॅग्स :diwaliदिवाळीRaigadरायगड