शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

खोदकामात सापडली शिवलिंगे

By admin | Updated: September 10, 2016 03:16 IST

शहरातील साई झुलेलाल मंदिरासमोरील रस्त्याचे खोदकाम सुरू असतांना मजुरांना दोन शिवलिंग सापडली.

उल्हासनगर : शहरातील साई झुलेलाल मंदिरासमोरील रस्त्याचे खोदकाम सुरू असतांना मजुरांना दोन शिवलिंग सापडली. स्थानिक नागरिक आणि मंदिराच्या ट्रस्टींच्या म्हणण्यानुसार सापडलेले शिवलिंग प्राचीन असून त्याजागी पूर्वी गोशाळा असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांसह महिलांनी पुजेसाठी एकच गर्दी केली आहे.उल्हासनगर कॅम्प नं-१ परिसरात साई झुलेलाल मंदिर आहे. मंदिरासमोरील रस्त्याच्या जागेवरून ट्रस्टी व नागरिकांत वाद झाला होता. अखेर नागरिकांना येण्या-जाण्यासाठी पालिकेने पुढाकार घेवून रस्त्याचे काम सुरू केले. शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास रस्ता खोदतांना एका मजुराला दोन गुळगुळीत लांबट दगड दिसले. त्याने हळूच ते वर काढले. नीट पाहिल्यावर ते शिवलिंग असल्याचे लक्षात आले. त्याची माहिती मंदिराच्या ट्रस्टींसह नागरिकांना मिळताच त्यांनी एकच गर्दी करून पुजा-अर्चा सुरू केली. खोदकामात निघालेले शिवलिंग अन्यत्र न हलविता तेथेच त्याची प्राणप्रतिष्ठा करण्याचा आग्रह नागरिकांनी धरला. स्थानिक नगरसेवक जया माखिजा तसेच भाजपाचे पदाधिकारी प्रकाश माखिजा, समाजसेवक प्रकाश तलरेजा, दीपक रोहरा यांच्यासह मंदिराचे प्रमुख साई लीलाराम मुलचंदानी यांनी शिवलिंग प्राचीन असल्याचा दावा केला. शासन स्तरावर त्याला अद्यापही दुजोरा मिळालेला नाही. आयुक्त मनोहर हिरे, पोलीस उपायुक्त सुनील भारद्बाज यांनी सापडलेल्या प्राचीन शिवलिंगाची माहिती घेणार असल्याचे सांगितले. मंदिर परिसरात नागरिकांसह महिलांनी त्या लिंगाच्या पुजेसाठी एकच गर्दी केली. ‘चालिया साहेब’ समाप्तीच्या दिवशी हा प्रकार घडल्याने श्रद्धाळूंत आनंदाची लहर पसरली. (प्रतिनिधी)