शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठाचा प्रबंध जगात सर्वोत्कृष्ट

By admin | Updated: November 25, 2014 00:38 IST

‘इशा’कडून गौरव : वाळव्याच्या सावंता माळी यांचा शोधप्रबंध

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान विभागाच्या पीएच.डी. शोधप्रबंधास आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट शोधप्रबंध म्हणून गौरविण्यात आले आहे. विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आणि दक्षिण कोरियातील ग्वांगझू येथील चेन्नॉम नॅशनल विद्यापीठाच्या स्कूल आॅफ अ‍ॅडव्हान्स्ड केमिकल इंजिनिअरिंगचे संशोधक डॉ. सावंता सुभाष माळी यांच्या शोधप्रबंधास फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय रसायनविद्युत व जलविद्युत संस्थेतर्फे (इशा) सर्वोत्कृष्ट शोधनिबंधाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. माळी यांनी विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान विभागात सौरघट निर्मितीविषयक संशोधन केले आहे. त्यांनी डॉ. प्रमोद एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सॉल्व्होथर्मल सिंथेसिस आॅफ टीआयओटू नॅनोपार्टिकल्स फॉर सोलार सेलप्लिकेशन्स’ या विषयावर विद्यापीठास शोधप्रबंध सादर केला होता. ‘इशा’ ही विद्युत संशोधन क्षेत्रातील संस्था आहे. ही संस्था दरवर्षी विद्युतघट संशोधन क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय योगदानासाठी जगातील तीन संशोधकांना पुरस्कार देऊन गौरविते. यामध्ये जीवनगौरव, वरिष्ठ वैज्ञानिक, सर्वोत्कृष्ट शोधप्रबंध या पुरस्कारांचा समावेश असतो. संस्था दर चार वर्षांनी आंतरराष्ट्रीय संशोधन परिषद भरविते. यात हे पुरस्कार दिले जातात. यावर्षीचा सर्वोत्कृष्ट शोधप्रबंधाचा पुरस्कार डॉ. माळी यांच्या शोधप्रबंधास जाहीर झाला. सर्वोत्कृष्ट शोधप्रबंध पुरस्कार मिळविणारे डॉ. माळी हे केवळ सन २०१० पासूनचे तिसरे पुरस्कारार्थी आहेत. यापूर्वी हा पुरस्कार जपानच्या डॉ. तकाकी तानगुशी (२०१०), अमेरिकेच्या डॉ. ख्रिस्तिना मोझॅड (२०१३) यांना मिळाला आहे. डॉ. माळी यांना संशोधनासाठी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, डॉ. प्रमोद एस. पाटील, चेन्नॉम नॅशनल विद्यापीठातील डॉ. सी. के. हाँग, प्रा. डॉ. जे. एच. किम, भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. सी. ए. बेट्टी यांचे सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)‘मटेरियल टुडे’कडूनही गौरवडॉ. माळी यांचे मूळ गाव बागणी काकाचीवाडी (ता. वाळवा, जि. सांगली). प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी शिक्षण पूर्ण करत हे यश मिळविले आहे. त्यांचे विविध आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय संशोधन नियतकालिकांत ५३ शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. तसेच त्यांनी विविध संशोधन परिषदांत ४५ शोधनिबंध सादर केले आहेत. त्यांच्या संशोधनास पदार्थविज्ञान शास्त्रातील ‘मटेरियल टुडे’ या शोधपत्रिकेने मुखपृष्ठावर स्थान देऊन त्यांचा गौरव केला आहे.