शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
3
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
4
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
5
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
6
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
7
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
8
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
9
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
10
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
11
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
12
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
13
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
14
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
15
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
16
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
17
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
18
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
19
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
20
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी

जयंत जाधव यांच्याऐवजी शिवाजी सहाणे आमदार

By admin | Updated: January 14, 2015 04:40 IST

२५ मे २०१२ रोजी झालेल्या या निवडणुकीत जाधव व सहाणे या दोघांनाही प्रत्येकी २२१ अशी समसमान मते मिळाली होती. त्यामुळे जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय

मुंबई : नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जयवंतराव पुंडलिकराव जाधव यांची अडीच वर्षांपूर्वी विधान परिषदेवर झालेली निवड मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी रद्द केली आणि त्या निवडणुकीत जाधव यांच्याऐवजी शिवसेनेचे शिवाजी लक्ष्मण सहाणे विजयी झाल्याचे घोषित केले.२५ मे २०१२ रोजी झालेल्या या निवडणुकीत जाधव व सहाणे या दोघांनाही प्रत्येकी २२१ अशी समसमान मते मिळाली होती. त्यामुळे जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी पेरियास्वामी वेल्लारसू यांनी चिठ्ठी पद्धतीने कौल देण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार जयंत जाधव विजयी झाल्याचे जाहीर केले होते. सहाणे यांनी याविरुद्ध उच्च न्यायालयात निवडणूक याचिका केली होती. न्या. राजेश केतकर यांनी या याचिकेवर मंगळवारी अंतिम निकाल दिला व जाधव यांची निवड रद्द करून त्यांच्याएवजी सहाणे विजयी झाल्याचे घोषित केले.निकाल जाहीर केल्यानंतर जाधव यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी त्यास स्थगिती देण्याची विनंती केली. ती मान्य करून न्या. केतकर यांनी आपल्या निकालाचा अंमल आठ आठवड्यांसाठी स्थगित केला. मात्र या स्थगितीच्या काळात जाधव आमदार निधीचा विनियोग करू शकणार नाहीत, अशी अट घालण्यात आली. परिणामी जाधव यांची आमदारकी तूर्तास तरी दोन महिन्यांसाठी वाचली आहे.या काळात त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळाली नाही तर त्यांच्याजागी सहाणे विधान परिषद सदस्य होतील व त्यांना मे २०१८पर्यंतचा कार्यकाळ मिळेल. या सुनावणीत सहाणे यांच्यासाठी ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांच्यासह अ‍ॅड. शीशैल देशमुख व अ‍ॅड. प्रवीण गोळे यांनी, जाधव यांच्यासाठी ज्येष्ठ वकील सी. एम. कोर्डे व अ‍ॅड. भूषण महाडिक यांनी तर निवडणूक आयोगासाठी अ‍ॅड. रेखा राजगोपाल यांनी काम पाहिले. (विशेष प्रतिनिधी)