शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

शिवचरित्राचे अभ्यासक निनाद बेडेकर यांचे निधन

By admin | Updated: May 11, 2015 02:56 IST

ज्येष्ठ इतिहास संशोधक, शिवचरित्राचे व्याख्याते आणि मराठेशाहीचे अभ्यासक निनाद बेडेकर यांचे रविवारी पहाटे अल्प आजाराने निधन झाले.

पुणे : ज्येष्ठ इतिहास संशोधक, शिवचरित्राचे व्याख्याते आणि मराठेशाहीचे अभ्यासक निनाद बेडेकर यांचे रविवारी पहाटे अल्प आजाराने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी वासंती, मुलगा निशांत, विवाहित कन्या नियती असा परिवार आहे.सांगली येथील दौऱ्याहून आल्यानंतर ते आजारी झाले. एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. अमेरिकेहून त्यांच्या कन्येचे आगमन झाल्यानंतर सोमवारी सकाळी ११च्या सुमारास पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.बेडेकर यांचा जन्म १७ आॅगस्ट १९४९ रोजी पुण्यात झाला. त्यांच्या मातोश्री प्रमिला या सरदार रास्ते यांच्या घराण्यातील. वडील गंगाधरपंत हे उत्तम खेळाडू होते आणि दिलरुबासह काही वाद्यांमध्ये त्यांचा हातखंडा होता. बालवयात बाबासाहेब पुरंदरे लिखित ‘दख्खनची दौलत’ हे पुस्तक त्यांच्या हाती पडले, तेव्हापासून ते गडकिल्ले, शिवइतिहास यांच्या प्रेमात पडले.मॅकॅनिकल इंजिनीअर झाल्यानंतर ते किर्लोस्कर कमिन्समध्ये दाखल झाले. १५ वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांनी केवळ गडकोटांच्या आकर्षणापोटी मोठे पद आणि पगाराची नोकरी सोडून दिली. महाराष्ट्रातील साडेतीनशे किल्ल्यांची भटकंती करून ५ हजार व्याख्याने दिली, शोधनिबंध सादर केले. देशविदेशातील गडांचे निरीक्षण करून गजकथा, दुर्गकथा लिहिल्या. त्यांची २० पुस्तके प्रसिद्ध आहेत.-------------१९६८पासून भारत इतिहास संशोधक मंडळात जाऊन गजाननराव मेहंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मोडी, पर्शियन, फार्सी, उर्दू भाषेतील कागदपत्रांचा अभ्यास सुरू केला. याद्वारे त्यांनी शिवाजी महाराज यांची ३ तर संभाजी महाराजांची २ अप्रकाशित पत्रे उजेडात आणली. त्यांनी सुंदर निसर्गचित्रे, रेखाचित्रे रेखाटली आहेत.