शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पेंग्विनच्या मृत्यूवरून शिवसेना अडचणीत

By admin | Updated: November 4, 2016 05:42 IST

केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणानेही याची गंभीर दखल घेत पालिका आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

मुंबई : राणीच्या बागेतील पेंग्विनच्या मृत्यू प्रकरणावरून राजकारण तापले असताना, आता केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणानेही याची गंभीर दखल घेत पालिका आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दुसरीकडे काँग्रेसने लोकायुक्तांकडे तक्रार करत पेंग्विन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात शिवसेनेच्या अडचणी वाढल्या आहेत.दक्षिण कोरियाहून मुंबईत आणलेल्या आठ पेंग्विनपैकी एकाचा गेल्या आठवड्यात मृत्यू झाला. पेंग्विनला मुंबईत आणण्यासाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेतला होता. त्यामुळे हीच संधी साधून विरोधकांनी शिवसेनेची नाकाबंदी सुरू केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पार्टी अशा सर्वच विरोधी पक्षांनी हा मुद्दा उचलून धरल्यामुळे अखेर याची दखल केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने घेतली आहे. पालिका आयुक्त अजय मेहता यांना पाठवलेल्या नोटीसद्वारे पेंग्विनच्या मृत्यूचा जाबच प्राधिकारणाने विचारला आहे. (प्रतिनिधी)पेंग्विनच्या शवविच्छेदनाचा अहवाल आणि राणीबागेतील अन्य सात पेंग्विनची देखभाल कशी केली जात आहे, याबाबत एका आठवड्यात उत्तर देण्याची मुदत प्राधिकरणाने दिली आहे. दुसरीकडे काँग्रेसने लोकायुक्तांकडे तक्रार करीत पेंग्विनची हेळसांड झाल्यामुळे दीड वर्षांच्या डोरी या मादा पेंग्विनचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. त्यानुसार, लोकायुक्तांकडून पालिकेला नोटीस येण्याची दाट शक्यता आहे. >प्राणिसंग्रहालयाची मान्यता धोक्यात?२०१० पासून प्राणिसंग्रहालयामध्ये १४० प्राणी व पक्षांचा मृत्यू झाला आहे. पेंग्विनच्या मृत्यूने राणीच्या बागेतील सुविधांवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने याची दखल घेऊन चौकशी सुरू केली आहे. यात प्राण्यांची हेळसांड होत असल्याचे उघडकीस आल्यास, प्राणिसंग्रहालयाची मान्यता धोक्यात येणार आहे.केंद्राच्या दोन नोटीस : सप्टेंबर महिन्यात केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने पालिकेला नोटीस पाठवून, सहा महिन्यांमध्ये प्राणिसंग्रहालयामध्ये प्राण्यांची चांगली सोय करण्यास बजावले होते. मात्र, गेल्या आठवड्यात पेंग्विनचा मृत्यू झाल्यामुळे प्राधिकरणाने दुसरी नोटीस पाठवून जाब विचारला आहे. >केंद्रीय प्राधिकरणाच्या पत्रात काय?दीड वर्षाच्या मृत पेंग्विनच्या आतड्यांना संसर्ग आणि यकृत निकामी होणे हे प्राणिसंग्रहालयातील व्यवस्था हलक्या दर्जाची असल्याचे संकेत देते. याबाबत प्राधिकरणाने दोन महिन्यांपूर्वी नोटीस पाठवून उचित काळजी घेण्यास बजावले होते. प्राधिकरणाचे पथक लवकरच मुंबईत येऊन प्राणिसंग्रहालयाची झाडाझडती घेणार आहेत. पेंग्विन आणण्याचा निर्णय चुकलादुर्मीळ प्रजातीपैकी असलेल्या पेंग्विनला व्यावसायिक कारणासाठी आयात करण्यावर बंदी आहे. त्यामुळे मूळ प्रदेशात त्यांना परत पाठविण्याची सूचनाही प्राधिकरणाकडून येण्याची शक्यता आहे. मात्र, सप्टेंबरच्या नोटिशीला महापालिकेने अद्याप उत्तर दिलेले नाही. त्यामुळे आता परत २८ आॅक्टोबरला प्राधिकरणाने दुसरी नोटीस पाठवली आहे. >पेंग्विन उत्तम अवस्थेतसातही हम्बोल्ट पेंग्विन उत्तम अवस्थेत असून, त्यांची प्रकृती चांगली आहे. हे सर्व पेंग्विन योग्य प्रकारे आहार घेत आहेत. यामध्ये एकूण ३ नर व ४ मादी यांचा समावेश आहे.- डॉ. संजय त्रिपाठी, संचालक (प्रभारी), वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय