शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या रडारवर आता पाकिस्तानी अभिनेते, फवाद खान, माहिराला विरोध

By admin | Updated: October 21, 2015 09:28 IST

पाकिस्तानी अभिनेता फवाद खान व माहिरा खान हे दोघे आता शिवसेनेच्या रडारवर असून त्यांना महाराष्ट्रात चित्रपट प्रमोशन करू देणार नाही, अशी भूमिका सेनेने घेतली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - पाकिस्तानी गायक, कलाकार, क्रिकेटपटूंना कडाडून विरोध दर्शवणा-या शिवेसेनेने आता पाकिस्तानी अभिनेत्यांना टार्गेट केले असून अभिनेता फवाद खान आणिइ माहिरा खान हे दोघे आता सेनेच्या रडारवर आहेत. फवाद आणि माहिराच्या चित्रपटाल शिवसेनेने विरोध दर्शवला असून त्यांना महाराष्ट्रात चित्रपटाचे प्रमोशन करू न देण्याची शपथच शिवसेनने घेतली आहे. याप्रकरणी संबंधित चित्रपट दिग्दर्शकांना शिवसेना पत्र पाठवणार आहे. 
फवाद खानने गेल्या वर्षी सोनम कपूर सोबत 'खूबसूरत' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला असून येत्या काळाही त्याच्याकडे अनेक चांगल्या ऑफर्स आहेत. लवकरच तो धर्मा प्रॉडक्शनच्या 'कपूर अँड सन्स' आणि रणबीर कपूर - अनुष्का शर्मा- ऐश्वर्या राय या स्टारकास्टसह 'ए दिल है मुश्किल'  या चित्रपटात झळकणार आहे.  तर पाकिस्तानमधील प्रसिद्ध अभिनेत्री, सौंदर्यवती माहिरा खान ही बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानसोबत 'रईस' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 
आम्ही कोणताही पाकिस्तानी क्रिकेटपटू, अभिनेता किंवा कलाकाराला महाराष्ट्राच्या भूमीवर पाय ठेवू देणार नाही, अशी भूमिका चित्रपट सेनेचे जनरल सेक्रेटरी अक्षय बर्दापूरकर यांनी मांडली आहे. यापूर्वी शिवसेनेन पाकिस्तानी गझलगायक गुलाम अली खान यांना विरोध दर्शवल्याने त्यांचा मुंबई व पुण्यातील कार्यक्रम रद्द करावा लागला होता.