वर्धा : निवडणुकीचा स्टंट म्हणून एखादा पक्ष आम्ही राजीनामा देतो म्हणत असेल, तर मला वाटते त्याला गांभीर्याने घेण्याचे कारण नाही, असा पलटवार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी येथे केला.सेलू तालुक्यातील येळाकेळी येथे पत्रकारांशी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘आमच्या दोन्ही पक्षांची युती या निवडणुकीमध्ये नाही, परंतु राज्य सरकारमध्ये आम्ही मिळून काम करतो. शिवसेनेने भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा काढलेला नाही. राजीनामा खिशामध्ये घेऊन फिरतो, असे ते म्हणत असले, तरीही ते राजीनामा देणार नाही, याची मला खात्री आहे. हे सरकार पाच वर्षे चालणारे सरकार आहे. सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका नाही,’ असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला. (जिल्हा प्रतिनिधी)
हा तर शिवसेनेचा राजकीय स्टंट
By admin | Updated: February 10, 2017 01:30 IST