शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेला अनेक पदाधिकाऱ्यांचा ‘जय महाराष्ट्र’!

By admin | Updated: September 28, 2016 01:07 IST

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकात आक्षेपार्ह व्यंगचित्र प्रकाशित करून मराठा समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी, जिल्ह्यातील शिवसेनेच्या अनेक

बुलडाणा : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकात आक्षेपार्ह व्यंगचित्र प्रकाशित करून मराठा समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी, जिल्ह्यातील शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ‘सामना’त प्रकाशित झालेल्या व्यंगचित्रामुळे आपल्या भावना दुखावल्याचे सांगून उपजिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, बुलडाणा नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष तसेच विद्यमान नगरसेवक हेमंत खेडेकर यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख रोहित खेडेकर व त्यांचे बंधु कपिल खेडेकर यांच्यासोबतच अनेक शिवसैनिकांनी शिवसेनेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ ठोकला. खेडेकर बंधुंच्या या निर्णयाने चिखली तालुक्यात, शिवसेनेत खळबळ उडाली आहे. मेहकर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजय जाधव यांनी यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे नगरसेवक पदाचा राजीनामा पाठविला आहे. त्यांच्यासोबतच शिवसेना तालुका प्रमुख सुरेश वाळूकर, उपतालुकाप्रमुख समाधान साबळे यांनीही शिवसेनेच्या पदाचे राजीनामे पाठविले आहेत. लोणार तालुक्यात गेल्या ३० वर्षांपासून शिवसेनेची धुरा सक्षमपणे सांभाळणारे तालुका शिवसेना प्रमुख प्रा. बळीराम मापारी यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवकुमार तेजनकर, पंचायत समिती सदस्य मनोज तांबीले, पुंजाराम दहातोंडे, जि.प.सदस्य सुलताने या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे ‘मातोश्री’वर पाठविले आहेत. यासोबतच नांदुरा तालुका प्रमुख बाळासाहेब धोरण, उप-तालुका प्रमुख सुनील जुनारे, वडनेरचे सर्कल प्रमुख संतोष बिजवे, मलकापूरचे युवा तालुका प्रमुख दीपक जवरे यांनीही राजीनामे पाठविले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)