शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या खेळीने शिवसेनेची कोंडी

By admin | Updated: January 19, 2016 03:53 IST

खेळाचे मैदान व उद्यानांच्या देखभालीसाठी मंजूर धोरणाला स्थगिती दिल्यानंतर भाजपाने सोमवारी स्वपक्षीय नेत्याच्या ताब्यात असलेले भूखंडही परत करीत शिवसेनेला शह दिला़

मुंबई : खेळाचे मैदान व उद्यानांच्या देखभालीसाठी मंजूर धोरणाला स्थगिती दिल्यानंतर भाजपाने सोमवारी स्वपक्षीय नेत्याच्या ताब्यात असलेले भूखंडही परत करीत शिवसेनेला शह दिला़ भाजपाचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी आपल्या संस्थेला काळजीवाहू तत्त्वावर मिळालेले उद्यान व मैदानांचा ताबा आयुक्तांकडे दिला़ मित्रपक्षाच्या या खेळीमुळे शिवसेनेची मात्र कोंडीच झाली आहे़खेळाचे मैदान व उद्यानाचे नवीन धोरण पालिका महासभेत बहुमताने मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यास स्थगिती दिली़ त्यामुळे आधी शिवसेनेच्या सुरात सूर मिसळणाऱ्या भाजपा नेत्यांना आपलेच शब्द फिरवत मंजूर धोरणावर फेरविचार करण्याची मागणी करावी लागली़ मात्र काळजीवाहू तत्त्वावर दिलेल्या भूखंडांपैकी काही भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांच्या संस्थेकडे असल्याने भाजपाचे हातही दगडाखाली होते़ भाजपाला कोंडीत पकडण्याची संधी शिवसेनेकडे होती़ मात्र खासदार शेट्टी यांनी आपल्या ताब्यातील सर्व मैदाने व उद्यानांचा ताबा १ फे्रबुवारी २०१६पासून सोडणार असल्याचे जाहीर करीत शिवसेनेला धक्का दिला़ दुसरीकडे मनसे आणि काँग्रेसने शिवसेना नेत्यांना त्यांच्या ताब्यातील मैदाने व उद्याने परत करण्याचे आव्हान दिले़ दरम्यान, हे धोरण अंमलात येऊ नये, यासाठी ठेकेदारांची लॉबी सक्रिय असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला़ मात्र भाजपाचे मुंबई अध्यक्ष अ‍ॅड़ आशिष शेलार यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांनी या धोरणाला स्थगिती दिल्याचे त्यांना स्मरण करून देताच शेट्टी यांनी विषयाला बगल दिली़ १२ लाख रुपये सदस्यत्व असलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शरद पवार यांना जाब का नाही विचारत, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला़ मात्र भाजपाचे शेलार मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणताच शेट्टी यांनी विषय टाळला़ पोयसर जिमखानाच्या सदस्यत्वासाठी घेतलेल्या निधीतून जमा झालेले १० कोटी रुपये बँकेत ठेवून त्याच्या व्याजातूनच उद्यानांची देखभाल होत आहे़ लोकांना मैदानं विनामूल्यच उघडून द्यावी, पण ते पालिकेने शक्य करून दाखवावे, असे आव्हानही शेट्टी यांनी दिले़