शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

मुंब्य्रात शिवसेना विमान घेऊन उडणार

By admin | Updated: May 18, 2016 03:02 IST

विधान परिषद निवडणुकीची धामधुम सुरु असतांनाच ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठीदेखील शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरु केली

ठाणे : एकीकडे विधान परिषद निवडणुकीची धामधुम सुरु असतांनाच ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठीदेखील शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मागील निवडणुकीत शिवसेना मुंब्य्रातून ज्या धनुष्यबाणामुळे पिछाडीवर पडली होती. तो धनुष्यबाण आता निवडणुकीपुरता भात्यात कोंबून मुंब्य्रातून आगामी निवडणूक विमान चिन्हावर अपक्ष म्हणून लढविण्याचे संकेत शिवसेनेने दिले आहेत. विधान परिषदेच्या एका जागेसाठी आता राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेनेची लढत रंगणार आहे. त्यानंतर लगेचच ठाणे पालिका निवडणुकीची तयारी सुरू होईल. यात अधिकाधिक जागांवर कब्जा करण्यासाठी शिवसेनेने आतापासूनच रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने उमेदवार मागे घेऊन राष्ट्रवादीचे देवराम भोईर यांची बिनविरोध निवड करुन भोईर अ‍ॅण्ड कंपनीला आपल्याकडे वळविण्याचे प्रयत्न केले. त्यात आगामी निवडणुकीत शिवसेना, भाजपा स्वबळावर निवडणुका लढविण्याच्या तयारीत असल्याने शिवसेनेने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यानुसार कमी नगरसेवक निवडून येणाऱ्या मुस्लिमबहुल मुंब्य्रातील विविध प्रभागांवर शिवसेनेने आपली नजर वळविली आहे. गेल्या खेपेला मुंब्य्रातून फारच कमी नगरसेवक शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आल्याने सत्तेसाठी शिवसेनेला तारेवरची कसरत करावी लागली होती. त्यामुळेच या भागांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी शिवसेनेने धनुष्यबाणाचा त्याग करण्याची खेळी खेळण्याचे ठरविले आहे. आपल्याच उमेदवारांना विमान चिन्हाखाली अपक्ष म्हणून उतरविण्याचा हा प्रयत्न आहे. सध्या चार पॅनलचा एक वॉर्ड होण्याच्या हालचालींना वेग आल्याने, कदाचित शिवसेनेची ही शक्कल यशस्वी ठरण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)मुंब्य्रातील काही शिवसेना समर्थकांनी ही योजना आखली असून ती आता श्रेष्ठींच्या कानावर घातली जाणार आहे. यातून जागा वाढतील, अशी आशा या मंडळींना वाटू लागली आहे. शिवसेनेच्या श्रेष्ठींनीदेखील विधान परिषदेची धामधुम संपल्यानंतर यावर चर्चा करण्याची तयारी दर्शविली आहे. परंतु शिवसेनेची ही खेळी मतदार राजा खरी ठरवणार का? हे मात्र येणारा काळच निश्चित करणार आहे.