शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

शिवसेनेच्या वाटेला गेले ते आडवे झाले - उद्धव ठाकरे

By admin | Updated: June 6, 2016 07:44 IST

जे शिवसेनेच्या वाटेला गेले ते एकतर आडवे झाले किंवा तुरुंगात गेले, असे इतिहास सांगतो. शिवसेनाद्वेषातून मिळवलेली सत्ता म्हणजे बुडबुडेच ठरतात.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ६ - जसे कर्म तसे फळ! कर्म नासले की फळ नासते. शिवसेनेबरोबर युती तोडण्याचा निर्णय आपणच कसा हिमतीने कळवला या कृतीचा अभिमान खडसे यांच्या चेहर्‍यावर शेवटपर्यंत दिसत होता. जे शिवसेनेच्या वाटेला गेले ते एकतर आडवे झाले किंवा तुरुंगात गेले, असे इतिहास सांगतो. शिवसेनाद्वेषातून मिळवलेली सत्ता म्हणजे बुडबुडेच ठरतात. बुडबुडे फुटू लागले आहेत अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'सामना'च्या अग्रलेखातून एकनाथ खडसे यांच्या गच्छंतीचा समाचार घेतला आहे. 
 
दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेबरोबरची अनेक वर्षांची युती तुटल्यानंतर एकनाथ खडसे यांनी सातत्याने शिवसेने विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. शिवसेनेनेही त्यांना टार्गेट केले होते. अखेर खडसे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यामुळे शिवसेनेला संधी मिळाल्यानंतर आज सामनाच्या अग्रलेखातून त्यांचा समाचार घेण्यात आला आहे. 
 
खडसे यांचे तथाकथित ‘पीए’ गजानन पाटील यांना एका जमीन व्यवहारात ३० कोटींची लाच मागताना पकडले, तेही मंत्रालयाच्या दारात. सहा महिन्यांपासून हे गजाननराव एसीबीच्या रडारवर होते व त्याची साधी खबरही चाणाक्ष खडसेसाहेबांना नव्हती. यातून गृहमंत्री असलेल्या फडणवीस यांची गोपनीय कार्यपद्धती लक्षात येते. विरोधी पक्षनेते असताना खडसे यांनी भल्याभल्यांवर पाळत ठेवून शिकार केली; पण स्वत: खडसे यांची शिकार कधी झाली ते त्यांना समजलेच नाही असे अग्रलेखात म्हटले आहे. 
 
काय म्हटले आहे अग्रलेखात 
- प्रिय मंत्रीपदाचा राजीनामा देऊन एकनाथ खडसे घरी गेले आहेत. त्यांचे जाणे ठरलेलेच होते, फक्त योग्य मुहूर्ताच्या शोधात मुख्यमंत्री फडणवीस असावेत. या कालच्या पोराला म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांना काय कळतेय! मी म्हणजेच सरकार असे जळगावच्या नाथाभाऊंना वाटत होते. पण या कालच्या पोराने फटाक्यात दारू कधी ठासली ते समजलेच नाही. ज्येष्ठ म्हणून नितीन गडकरी यांनी दिल्लीचा निरोप नाथाभाऊंना देण्याचे काम तेवढे केले. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे शेवटच्या क्षणापर्यंत एकनाथ खडसे निष्कलंक व निर्दोष असल्याचा राग आळवीत होते; पण दिल्लीला राग आल्याने दानव्यांचे दानही उलटे पडले. प्रश्‍न इतकाच आहे की, रावसाहेब दानव्यांपासून संपूर्ण भारतीय जनता पक्षाला वाटत होते की, खडसे यांच्यावरील आरोप साफ खोटे आहेत, हा त्यांच्याविरुद्धचा बनाव आहे, त्यांचे सरळ सरळ चारित्र्यहनन आहे. मग या निर्दोष व निष्कलंक माणसाला वाचवण्याची हिंमत दाखवायची सोडून त्यांचा राजीनामा घेण्याचा पळपुटेपणा का दाखवला, खडसे यांच्या निर्दोषत्वाचा घंटानाद करण्यासाठी मुख्यमंत्री पुढे का सरसावले नाहीत ?
- विरोधी पक्षनेते असलेल्या खडसे यांनीही उडवला होता. खडसे यांचे तथाकथित ‘पीए’ गजानन पाटील यांना एका जमीन व्यवहारात ३० कोटींची लाच मागताना पकडले, तेही मंत्रालयाच्या दारात. सहा महिन्यांपासून हे गजाननराव एसीबीच्या रडारवर होते व त्याची साधी खबरही चाणाक्ष खडसेसाहेबांना नव्हती. यातून गृहमंत्री असलेल्या फडणवीस यांची गोपनीय कार्यपद्धती लक्षात येते. विरोधी पक्षनेते असताना खडसे यांनी भल्याभल्यांवर पाळत ठेवून शिकार केली; पण स्वत: खडसे यांची शिकार कधी झाली ते त्यांना समजलेच नाही. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या कराचीमधील घरातून सन्माननीय खडसे यांच्या खास फोनवर ‘घंटा’ वाजली त्याला ते काय करणार! हा सर्व बनाव असल्याचे प्रात्यक्षिक खडसे यांनी करून दाखवले. तरी विरोधकांचे घंटा बडवणे काही थांबले नाही. एमआयडीसीची पुण्यातील जमीन रद्दीच्या भावात नातेवाईकांच्या नावावर खरेदी करण्याची ‘जादू’ खडसे यांनी करून दाखवली. याच काळात हप्तेबाजीचे आरोपही खडसेंवर झाले व या आरोपांविरुद्ध खडसे एकाकी लढत राहिले. पण अखेर शस्त्र खाली ठेवून खडसे यांना मुक्ताई नगरचा मार्ग धरावा लागला. 
- आरोप करणार्‍यांकडे पुरावे नाहीत, एकतरी पुरावा द्या, राजकारण सोडेन’’ अशी भाषा खडसे यांनी केली. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगात असलेले छगन भुजबळसुद्धा ओरडून ओरडून तेच सांगत आहेत. ‘आदर्श’ इमारतीच्या घोटाळ्यात गुन्हेगार ठरवलेल्या अशोक चव्हाण यांचे तेच सांगणे आहे. घरकुल घोटाळ्यात खडसेकृपेने तुरुंगात असलेले सुरेशदादा जैन हेसुद्धा निर्दोष असल्याचेच सांगत आहेत. सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा हेदेखील त्यांच्यावरील आरोपांबाबत, ‘‘निर्दोष आहे; पुरावे द्या’’ असे ओरडून सांगत आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप करून खडसे यांनी भल्याभल्यांना कायमचे घरी पाठवले. शेवटी खडसे यांनाही घरी जावे लागले.
- इतरांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे फडकवणारे किरीट सोमय्या या सर्व प्रकरणात मौन बाळगून होते हासुद्धा नैतिकतेचा घोटाळाच मानायला हवा. निदान खडसे निर्दोष असल्याचे पुरावे तरी त्यांनी फडकवायला हवे होते. मीडिया ट्रायल झाल्याने जावे लागले असे खडसे यांना वाटत असेल तर ते चूक आहे. गजानन पाटलांना पकडल्यावर ही बातमी मीडियाने दिली. पुण्याच्या जमीन प्रकरणाचा तपशील राज्याच्या उद्योगमंत्र्यांनीच जाहीर केला व खडसे यांच्या मोबाईल फोनवर दाऊदचे नंबर मीडियाने घुसवले नाहीत. जसे कर्म तसे फळ! कर्म नासले की फळ नासते.