शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना निवडणुकीसाठी कधीही तयार - रामदास कदम

By admin | Updated: June 9, 2017 18:12 IST

शिवसेना हा नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणारा पक्ष असून निवडणुकीसाठी आम्ही कधीही तयारच असतो़ योग्यवेळी योग्य निर्णय

ऑनलाइन लोकमतनांदेड, दि. 9 : शिवसेना हा नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणारा पक्ष असून निवडणुकीसाठी आम्ही कधीही तयारच असतो़ योग्यवेळी योग्य निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील, असे सुचक वक्तव्य राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी शुक्रवारी नांदेडात केले़ नांदेड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकीसाठी मंत्री कदम हे सकाळी रेल्वेने दाखल झाले़ शुक्रवारी दिवसभरात दोन टप्प्यात त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुखांकडून मतदारसंघनिहाय आढावा घेतला़़ त्यानंतर आयोजित पत्रपरिषदेत मंत्री कदम म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस एकीकडे शेतकऱ्यांसोबत असल्याचे सांगत आहे अन् दुसरीकडे पंतप्रधानांना भेटून सत्तेत घुसण्याची तयारी सुरु आहे़ शेतकरी आत्महत्येचे पाप हे राष्ट्रवादी काँग्रेसचे असून त्यांनी महाराष्ट्र कर्जबाजारी केला़ सिंचनात ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार केला़, त्यांनी आम्हाला सल्ले देवू नयेत़काँग्रेस - राष्ट्रवादीला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करण्याचा अधिकार नाही़ एवढे वर्षे सत्तेत राहून त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? हा महत्वाचा प्रश्न आहे़ सेनेच्या लोकांच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादीकडून खिल्ली उडविण्यात येत आहे़ कारण सेनेने सत्तेतून बाहेर पडावे आणि राष्ट्रवादीने भाजपला साथ द्यावी अशी त्यांची खेळी आहे़ आपल्या कर्माच्या सर्व फायली बंद करण्यासाठीच राष्ट्रवादीला सत्तेत सामील व्हायचे आहे, असेही ते म्हणाले. शिवसेना ही नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे़ त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढा देण्याची आमची तयारी आहे़ जर या राज्यात शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतील तर शिवसेना पक्षप्रमुख सत्तेला कधीही लाथ मारतील असेही मंत्री कदम यांनी सांगितले.