शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
4
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
5
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
6
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
7
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
8
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
9
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
10
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
11
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
12
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
13
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
14
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
15
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
18
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
19
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
20
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

महायुतीबाबत शिवसेना सकारात्मक

By admin | Updated: July 15, 2016 00:22 IST

महापालिका निवडणुकीसाठी भाजपाचे खासदार अमर साबळे यांनी शिवसेनेला युतीचा प्रस्ताव दिला. त्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी खासदार आढळराव पाटील यांची अनौपचारिक भेट घेतली

पिंपरी : महापालिका निवडणुकीसाठी भाजपाचे खासदार अमर साबळे यांनी शिवसेनेला युतीचा प्रस्ताव दिला. त्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी खासदार आढळराव पाटील यांची अनौपचारिक भेट घेतली. युतीच्या प्रस्तावावर सेनेनेही सकारात्मक प्रतिसाद दिला. ‘युतीच्या निर्णयाबाबत पक्षप्रमुख निर्णय घेतील, असे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले. त्यामुळे प्राथमिक चर्चेत युतीबाबत सेनाही सकारात्मक असल्याचे दिसून येत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. राष्ट्रवादी हटावचा आणि भ्रष्टाचारमुक्त महापालिका करण्याचा नारा भाजपाने दिला असून, महापालिकेत सत्ता मिळवायची असेल, तर शिवसेना-भाजपाची युती आवश्यक आहे, अशी भूमिका साबळे यांनी मांडून शिवसेनेपुढे युतीचा प्रस्ताव दिला होता. त्यानंतर युतीबाबत शिवसेनेची भूमिका काय असेल, याबाबत शहरातील राजकारणात उत्सुकता होती. भाजपा- सेनेच्या कार्यकर्त्यांतही युतीच्या निर्णयाबाबत उत्सुकता होती.दरम्यान, भोसरी येथील खासदार आढळराव यांच्या कार्यालयास भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, प्रदेशचे पदाधिकारी एकनाथ पवार, शहर सरचिटणीस सारंग कामतेकर यांनी सदिच्छा भेट दिली. त्या वेळी शिवसेनेचे पिंपरीचे आमदार गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख राहुल कलाटे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)महापालिका निवडणुकीबाबत भाजपाने शिवसेनेपुढे युतीचा प्रस्ताव दिला. त्याचे आम्ही स्वागत करतो. युतीबाबत आम्हीही सकारात्मक आहोत. मात्र, युतीबाबत निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आहे. प्रस्तावाची माहिती पक्षप्रमुखांना देऊ.- शिवाजीराव आढळराव पाटील (खासदार) भाजपाने युतीचा हात पुढे केला आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो. युतीबाबत आम्हीही सकारात्मकच आहोत. याबाबत निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार पक्षप्रमुखांचा आहे. ते निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल.- राहुल कलाटे (शहरप्रमुख, शिवसेना)