शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना विरोधकांसोबत

By admin | Updated: March 21, 2017 04:12 IST

: राज्यातील २५ जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक उद्या, मंगळवारी होत असून भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी

मुंबई : राज्यातील २५ जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक उद्या, मंगळवारी होत असून भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याची भूमिका शिवसेनेने घेतली आहे. तर कसेही करून जास्तीतजास्त ठिकाणी सत्ता आणण्याच्या प्रयत्नात प्रसंगी राष्ट्रवादीला सोबत घेण्याची भूमिका भाजपाकडून घेतली जाऊ शकते. स्थानिक आघाड्या, अपक्षांचीही भूमिका महत्त्वाची ठरेल. काहीही करुन आपली सत्ता आणा, असे आदेश भाजपाच्या मंत्र्यांना पक्षाकडून देण्यात आले आहेत. लातूर, वर्धा, चंद्रपूरमध्ये भाजपाचे बहुमत असल्याने तेथे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद त्यांच्याकडेच जाणार हे स्पष्ट आहे. तर पुणे आणि सातारामध्ये राष्ट्रवादीचे बहुमत असल्याने अध्यक्षपद त्यांच्याकडे जाईल. रत्नागिरीमध्ये शिवसेनेचे बहुमत असल्याने तेथे भगवा फडकणार हे नक्की आहे. सिंधुदुर्गमध्ये काँग्रेसची स्वबळावर सत्ता निश्चित आहे. नांदेडमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली असून, अध्यक्षपद काँग्रेसला तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीला असे सूत्र ठरले आहे. तर ६२ सदस्यीय औरंगाबाद जिल्हा परिषदेत काँग्रेस (१६) - शिवसेना (१९) एकत्र आल्याने त्यांची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. २३ सदस्य असलेल्या भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेने काँग्रेसशी जवळीक केली आहे. प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या जालन्यातील चित्र अस्पष्ट आहे. ५६ सदस्यसंख्या असून, त्यात भाजपाचे सर्वाधिक २२ सदस्य आहेत. शिवसेनेचे १४ आणि २ अपक्ष असे १६ संख्याबळ असून, राष्ट्रवादीचे १३ आणि काँग्रेसचे ५ सदस्य आहेत. भाजपा-राष्ट्रवादी की राष्ट्रवादी-शिवसेना असे समीकरण होईल याबाबत अनिश्चितता आहे. परभणीमध्ये राष्ट्रवादी (२४) आणि काँग्रेस (६) अशी सत्ता स्थापन होण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. हिंगोलीमध्ये शिवसेना (१५) - काँग्रेस (१२) - राष्ट्रवादी(१२) अशी आघाडी निश्चित दिसते. तेथे अध्यक्षपद शिवसेनेकडे जाईल. उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादी (२६) बहुमतापासून केवळ दोनने दूर आहे. मात्र, तेथे गेल्या वेळी जिल्हा परिषदेत असलेली काँग्रेस-भाजपा-शिवसेना अशी आघाडी झाली तरच राष्ट्रवादीचे सत्तेचे स्वप्न तुटू शकते. सांगलीमध्ये ६० सदस्य संख्या असून, त्यात सर्वाधिक २५ भाजपाचे आहेत. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत आघाडीचे चौघे भाजपासोबत जातील. शिवसेनेचे तिघे भाजपासोबत येतील, असे मानले जाते. तसे झाले तर अध्यक्षपद भाजपाकडे जाईल. सोलापूरमध्ये भाजपा, विविध आघाड्या आणि राष्ट्रवादीचे फुटीर सदस्य यांच्या आधारे सत्तेची मोट बांधली जाईल, असे चित्र आहे. तर गडचिरोलीमध्ये भाजपा-आदिवासी विद्यार्थी संघ-राष्ट्रवादी अशी युती होऊन सत्ता स्थापन होऊ शकते. भाजपा-आदिवासी विद्यार्थी संघ यांची युती झाल्यास संख्याबळ २७ होऊन बहुमताने सत्ता मिळू शकते. (प्रतिनिधी)सदस्य अज्ञातस्थळीअटीतटीच्या लढती असलेल्या बहुतेक जिल्हा परिषदांमध्ये प्रत्येक पक्ष/आघाड्यांनीआपल्या सदस्यांना अज्ञातस्थळी हलविले आहे. बंडखोरी होऊ नये, याची काळजी घेतली जात आहे. त्यांना उद्या थेट मतदानालाच आणले जाईल. स्थानिक पातळीवर निर्णय होतीलजिल्हा परिषदांच्या अध्यक्ष निवडीत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जिथे शिवसेनेला मदत करण्याचा विषय असेल, तिथे तो निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़ अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले़ राज्यात भाजपाला रोखण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अजित पवार यांच्याशी चर्चा झाली असून, आघाडीवर शिक्कामोर्तब झाले आहे़ - अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस