मुंबई : भाजपाप्रणीत अल्पमतामधील सरकारने शिवसेनेला तुलनेने अत्यंत कमी महत्त्वाची खाती देऊ केल्याने नाराज झालेल्या शिवसेनेने दोन महत्त्वाची खाती भाजपाकडे असतील, तर एक खाते शिवसेनेकडे हवे, असा आग्रह धरल्याने स्थिर सरकारकरिता शिवसेनेला सोबत घेण्याच्या मार्गात गतिरोध निर्माण झाला आहे. शिवसेनेला भाजपाकडून अपेक्षित प्रतिसाद लाभला नाही तर ८ नोव्हेंबरनंतर केव्हाही आपली भूमिका जाहीर करण्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठरवल्याचे कळते.भाजपाने शिवसेनेला कृषी, कामगार अशी तुलनेने कमी महत्त्वाची खाती देऊ केल्याने शिवसेना नेतृत्व नाराज झाले आहे. दोन महत्त्वाची खाती भाजपाकडे असतील तर एक महत्त्वाचे खाते शिवसेनेकडे सोपवा, अशी मागणी शिवसेनेने केली असल्याचे कळते. वानगीदाखल गृह व महसूल ही खाती भाजपाकडे असतील तर गृहनिर्माण खाते शिवसेनेला हवे आहे. अर्थ व नगरविकास ही खाती भाजपा स्वत:कडे राखणार असेल, तर ऊर्जा खाते शिवसेनेला देण्याची मागणी आहे. कॅबिनेट व राज्यमंत्री मिळून किमान १० मंत्रिपदे शिवसेनेला हवी आहेत.
शिवसेनेला हवे दोनास एक मंत्रिपद
By admin | Updated: November 5, 2014 04:52 IST