शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
4
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
5
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
6
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
7
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
8
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
9
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
10
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
11
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
12
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
13
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
14
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
15
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
16
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
17
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
18
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
19
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
20
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा

भाजपच्या मंत्र्याविषयी शिवसेना आमदारांची तीव्र नाराजी

By admin | Updated: July 20, 2016 20:19 IST

राज्यातील सत्ता टिकविण्यापुरताच शिवसेनेच्या आमदारांचा सध्या राज्यात वापर सुरु असून भाजप मंत्री त्यांना किंमत देत नसल्याची सल मुंबईत बुधवारी झालेल्या

ऑनलाइन लोकमत

कोल्हापूर, दि. 20 -  राज्यातील सत्ता टिकविण्यापुरताच शिवसेनेच्या आमदारांचा सध्या राज्यात वापर सुरु असून भाजप मंत्री त्यांना किंमत देत नसल्याची सल मुंबईत बुधवारी झालेल्या पक्षाच्या प्रमुख आमदारांच्या बैठकीत व्यक्त झाली. विधानभवनातील एका कॅबिनेट मंत्र्याच्या दालनात ही बैठक झाली. शिवसेनेने विभागांसाठी नेमलेले प्रतोद यांच्यासह प्रमुख मोजकेच आमदार बैठकीस उपस्थित होते.ही नाराजी व्यक्त होवून आमदार तिथेच थांबले नाहीत. त्यांनी तातडीने पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना बैठकीतूनच फोन लावला. त्यांच्या कानांवर ही नाराजी घालण्यात आली. येत्या चार दिवसांत त्यांची प्रत्यक्ष भेट घेवून ही नाराजी व्यक्त करण्याचा व पुढील दिशा ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्या जिल्ह्यांमध्ये भाजपचे पालकमंत्री आहेत त्या जिल्ह्यांमध्ये शिवसेनेच्या आमदारांना सापत्नपणाची वागणूक दिली जाते. पालकमंत्र्यांकडून मागितलेला निधी दिला जात नाही. कोणत्याही जिल्ह्यांमध्ये भाजपचे पालकमंत्री नवीन घोषणा अथवा निधी वितरित करायचा झाल्यास त्या मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या उमेदवारांच्या विरोधात पराभूत झालेल्या उमेदवारास बोलवून त्याच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेतला जातो. हे आम्ही आणखी किती दिवस सहन करायचे अशी संतप्त विचारणा या बैठकीत झाली.भाजप मंत्र्यांच्या या आडवणूकीमुळे यापुढील काळात शिवसेना आमदारांना निवडणूका लढविणे अवघड होणार असल्याची भिती व्यक्त झाली.