शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

शिवसेनेशी स्वत:हून चर्चेला जाणार नाही

By admin | Updated: January 13, 2017 23:39 IST

शिवसेनेकडून युती करण्यासाठी सन्मानजनक प्रस्ताव आला तरच त्यावर विचार केला जाईल. भाजप स्वत:हून कुठलाही प्रस्ताव देणार नाही

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 13 : शिवसेनेकडून युती करण्यासाठी सन्मानजनक प्रस्ताव आला तरच त्यावर विचार केला जाईल. भाजप स्वत:हून कुठलाही प्रस्ताव देणार नाही. भाजप नेते स्वत:हून चर्चेसाठी जाणार नाहीत. शिवसेना नेत्यांनी भाजप नेत्यांची भेट घेऊन विनंती केली व सन्मानजनक प्रस्ताव दिला चर्चा होईल. शहरात आपली शक्ती व जनतेचा असणारा पाठिंबा यावर आत्मचिंतन करूनच शिवसेनेचा प्रस्ताव द्यावा, अशी रोखठोक भूमिका भाजप नेत्यांनी घेतली आहे. यामुळे भाजप-सेना युतीचे भवितव्य अंधातरी दिसत आहे. गेल्यावेळी शिवसेनेचे ५१ जागांचा प्रस्ताव दिला होता. चर्चेच्या तीन फेऱ्या झाल्या. दुसऱ्या फेरीत मतभेद होऊन युती तुटल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र, शेवटी दोन्ही बाजुच्या नेत्यांनी सावरत तिसऱ्या फेरीत शिवसेनेला १८ जागा देत युतीवर शिक्कामोर्तब केले होते. या वेळी अद्याप शिवसेनेकडून कुठलाही प्रस्ताव भाजपकडे आलेला नाही.

चार सदस्यीय प्रभाग असल्यामुळे शिवसेनेलाच आपली गरज आहे, अशी भापजी धारणा झाली आहे. त्यामुळे भाजपही स्वत:हून पुढाकार घेण्यास इच्छुक नाही. युतीबाबत भाजपचे शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे यांना विचारणा केली असता ते म्हणाले, भाजपने शिवसेनेपुढे नतमस्तक व्हावे, अशी परिस्थिती नागपूर शहरात नाही. शहरातील सहाही आमदार भाजपचे आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी लोकसभा निवडणुकीत २ लाख ६५ हजार मतांनी जिंकले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरकरांमध्ये विश्वास निर्माण केला आहे. त्यामुळे भाजपला कुणापुढेही हात जोडण्याची गरज नाही. शिवसेनेनी विनंती केली तर पढे बघता येईल. काहीतरी अवास्तव प्रस्ताव आल्यास नुसत्या चर्चेत वेळ घालविण्यात भाजपला रस नाही. सर्व पर्यायांसह आमची तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दोनअंकी जागाही देणे कठीण ? - गेल्यावेळी भाजपने शिवसेनेसाठी युतीत १८ जागा सोडल्या होत्या. याशिवाय ४ जागांवर मैत्रीपूर्ण लढत झाली होती. त्यापैकी शिवसेनेचे ६ नगरसवेक निवडून आले. आता शितल घरत यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सध्यस्थितीत भाजप दोन आकडी जागा देण्यासही तयार नाही. सन्मानजनक प्रस्ताव आला तरच युती - भाजप नेत्यांविषयी उपरोधक, अपमानजनक आणि महाराष्ट्राच्या सन्मानाला ठेच पोहचविणारे शब्द वापरणाऱ्या कोणत्याही व्यक्तिशी आपण युतीची चर्चा करणार नाही. भाजप नेते स्वत:हून चर्चेला जाणार नाहीत. शिवसेनेचे नेते स्वत:हून सन्मानजनक प्रस्ताव घेऊ आले तरच युतीचा विचार करू. नुसत्या चर्चेत वेळ घालविण्यात भाजपला रस नाही.- आ. सुधाकर कोहळे, शहर अध्यक्ष भाजप