शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना - भाजपाचं ठरलं.... युती तर होणारच ?

By admin | Updated: November 26, 2014 12:26 IST

शिवसेना - भाजपा युतीविषयी महिनाभर खलबतं केल्यानंतर अखेर हे दोन्ही पक्ष एकत्र येण्यासाठी राजी झाल्याचे वृत्त आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २६ - शिवसेना - भाजपा युतीविषयी महिनाभर खलबतं केल्यानंतर अखेर हे दोन्ही पक्ष एकत्र येण्यासाठी राजी झाल्याचे वृत्त आहे. शिवसेना आगामी काही दिवसांमध्ये देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सहभागी होणार असून केंद्रातही शिवसेनेच्या वाट्याला राज्यमंत्रीपद येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार भाजपाध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात अनौपचारिक चर्चा झाली आहे. यामध्ये शिवसेनेच्या दहा नेत्यांचा फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात समावेश केला जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. शिवसेनेने उपमुख्यमंत्रीपदाची आशा सोडून दिली असली तरी गृह खाते हे शिवसेनेकडे जाईल असे समजते. सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, ग्रामविकास, उर्जा ही खातीही शिवसेनेला दिली जातील अशी चिन्हे आहेत. मात्र खातेवाटपाचा अंतिम निर्णय पक्षाचे राज्यातील नेतेच घेतील असे सूत्रांनी सांगितले. 
केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार अनिल देसाई यांना केंद्रीय राज्यमंत्रीपद दिले जाणार आहे. नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात अनिल देसाई यांना राज्यमंत्रीपद दिले जाणार होते. मात्र राज्यातील निर्णय होत नसल्याने देसाई दिल्ली विमानतळावरुनच माघारी परतले होते. शिवसेना - भाजपाच्या मनोमिलनाचा फायदा भाजपाला संसदेत होणार आहे. शिवसेनेने विमा विधेयकाला विरोध दर्शवला होता. पण दोन्ही पक्षाचे मनोमिलन झाले तर शिवसेना या विधेयकाला पाठिंबा देईल अशी शक्यता आहे. शिवसेनेचे राज्यसभेत तीन तर लोकसभेत १८ खासदार आहे. त्यामुळे भाजपाच्या दृष्टीने या खासदारांचा पाठिंबा महत्त्वाचा ठरु शकेल.