शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत शिवसेना, भाजपा तुल्यबळ!

By admin | Updated: February 24, 2017 06:20 IST

मुंबई महापालिकेत ८४ जागांसह शिवसेना नंबर एकचा पक्ष ठरला असला तरी त्याच्यापेक्षा केवळ दोनच

यदु जोशी / मुंबईमुंबई महापालिकेत ८४ जागांसह शिवसेना नंबर एकचा पक्ष ठरला असला तरी त्याच्यापेक्षा केवळ दोनच कमी म्हणजे ८२ जागांवर यश मिळवित भाजपाने जोरदार यश संपादन केले. ठाण्याचा गड शिवसेनेने राखला असला तरी नागपूर, पुणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, अमरावती, अकोला या सहा महापालिकांमध्ये भाजपाने बहुमत मिळविले. सोलापूर आणि उल्हासनगरमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष असून इतर पक्ष/अपक्षांच्या सहकार्याने सत्तेत येईल, अशी स्थिती आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिकेत भाजपा आणि शिवसेनेची लढाई जवळपास बरोबरीत सुटली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या विकास आणि पारदर्शकतेच्या अजेंड्याला मुंबईकरांनी मोठा प्रतिसाद दिला तर शिवसेनेने आपल्या परंपरागत मतदारांच्या आधारे यश मिळविले. सकाळी शिवसेनेने निकालात आघाडी घेतल्यानंतर शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला मात्र, दुपारनंतर भाजपाच्या एकेक जागा वाढत गेल्या आणि कमळ फुलू लागले. अंतिम निकालात दोघांमध्ये केवळ दोनचे अंतर राहिले. मिळाल्याने सत्तेचे समीकरण कसे असेल, भाजपा आणि शिवसेना एकत्र येतील या बाबत उत्सुकता आहे. अपक्षांना जवळ करण्याची रणनीती दोघांनीही आखली आहे. गेल्यावेळी केवळ नागपूर महापालिकेत भाजपाकडे सत्ता होती. यावेळी सहा महापालिकांमध्ये एकहाती सत्ता, इतर दोन ठिकाणी सत्तेकडे वाटचाल आणि मुंबईत शिवसेनेच्या बरोबरीने यश मिळवित भाजपाने जोरदार मुसंडी मारली. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसला जबर धक्के बसले. एकाही महापालिकेत त्यांना बहुमत मिळाले नाही वा सत्तेच्या जवळदेखील जाता आलेले नाही. मुंबईत केवळ ३१ जागांवर समाधान मानावे लागल्यानंतर माजी खासदार संजय निरुपम यांनी मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.ठाण्याचा गड राखत शिवसेनेने बहुमत मिळविले. तेथे राष्ट्रवादी दुसऱ्या तर भाजपा तिसऱ्या क्रमांकावर राहिली. नाशिक कोणाचे भाजपा, शिवसेना की मनसेचे याचे उत्तर भाजपाला बहुमत देत नाशिककरांनी दिले. निवडणुकीच्या काळात वादात अडकलेल्या भाजपावर नाशिककरांनी संपूर्ण विश्वास व्यक्त करीत सत्तेच्या चाव्या सोपविल्या. विदर्भातील अमरावती आणि अकोला महापालिकेत भाजपाने पहिल्यांदाच बहुमताने सत्ता संपादन केली आहे. सोलापूरमध्ये भाजपा बहुमताच्या नजीक आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या शहरात कमळ फुलले. तेथे शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे. उल्हासनगरमध्ये भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या. साई आघाडी आणि अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापण्याची तयारी भाजपाने सुरू केली आहे.मनसेची दाणादाणगेल्यावेळी नाशिकमध्ये सत्तेत असलेल्या राज ठाकरे यांच्या मनसेला यावेळी केवळ पाच जागांवर समाधान मानावे लागले. मुंबईत गेल्यावेळी २७ जागा जिंकलेल्या मनसेला सात जागांवर थांबावे लागले. पुण्यात गेल्यावेळी लक्षणीय यश मिळविलेल्या मनसेने दोनच जागा जिंकल्या.नागपूर, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा जोरातमुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गड असलेल्या नागपुरात भाजपा १४५ पैकी शंभरावर जागा जिंकत काँग्रेसला जोरदार तडाखा दिला. नेत्यांच्या आपसातील भांडणांमुळे त्रस्त असलेल्या काँग्रेसची नागपुरात दैना झाली.पुण्यात गर्दी नसल्याने मुख्यमंत्र्यांची सभा रद्द करावी लागली म्हणून खिल्ली उडविली गेली त्याच पुण्याने बहुमताचे दान भाजपाच्या पदारात पहिल्यांदाच टाकले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये सत्तेची चावी ही माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडे होती पण तिथे भाजपाने राष्ट्रवादीला चारीमुंड्या चित करीत बहुमत मिळविले. यांना धक्काअजित पवार, राज ठाकरेसुशीलकुमार शिंदेयांचे यश फडणवीस, उद्धव ठाकरे, नितीन गडकरी