शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांना शह देण्यासाठी शिवसेना-भाजपाची मोट

By admin | Updated: November 4, 2016 01:28 IST

पुणे विधान परिषद निवडणुकीसाठी माजी आमदार विलास लांडे यांनी अपक्ष अर्ज दाखल करून राष्ट्रवादीसमोर अडचण निर्माण केली

पिंपरी : पुणे विधान परिषद निवडणुकीसाठी माजी आमदार विलास लांडे यांनी अपक्ष अर्ज दाखल करून राष्ट्रवादीसमोर अडचण निर्माण केली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शह देण्यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना मानणारा गट, तसेच शिवसेना, भाजपा व मनसेची मोट बांधून पाठिंबा मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.विधान परिषद निवडणुकीतील विलास लांडे यांच्या बंडखोरीने राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी झाली आहे. लांडे यांच्या उमेदवारीला चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचा पाठिंबा असल्याची चर्चाही शहरात रंगली आहे. लांडे-जगताप ही जोडगोळी अजित पवार यांना शह देणार असल्याची चर्चाही रंगली आहे. त्यासाठी राष्ट्रवादीतील नाराज नगरसेवक आणि शिवसेना-भाजपातील सदस्यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी लांडे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.महापालिकेतील संख्याबळ ...राष्ट्रवादी काँग्रेसचे ८३, शिवसेना १४, काँग्रेसचे १३, भाजपाचे तीन, मनसेचे चार, अपक्ष दहा, आरपीआय गट एक असे एकूण १२८ नगरसेवक आहेत. त्यांपैकी जगताप गटाचे समर्थक २२, लांडे गटाचे समर्थक २० नगरसेवक आहेत. युती आणि आघाडीचा निर्णय काय होणार ? यावरही लढत अवलंबून असणार आहे. (प्रतिनिधी)>बंडखोरी : वेगळी समीकरणे होणारराष्ट्रवादीचे उमेदवार अनिल भोसले यांनी लांडे यांची भोसरीत येऊन आज भेट घेतली. अर्ज माघारी घेऊन पाठिंबा द्यावा, अशी विनंती केली. तसेच, लांडे यांनी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची भेट गुरुवारी भेट घेऊन शिवसेनेकडून पाठिंबा मिळविण्याची मागणी केली. लांडे यांनी थेट आढळरावांशी चर्चा केल्याने वेगळी समीकरणे उदयास येण्याची शक्यता आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते व माजी महापौर आझम पानसरे यांचीही लांडे यांनी भेट घेतली. शिवाय शहरातील अन्य नेत्यांच्या भेटीवर लांडे यांनी भर दिला आहे. राष्ट्रवादीतील नाराज नगरसेवक, पदाधिकारी, शिवसेना, भाजपा, मनसेची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. येत्या शनिवारी माघारीचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर विधान परिषदेची लढत कशी असेल, हे सिद्ध होणार आहे.