शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांना शह देण्यासाठी शिवसेना-भाजपाची मोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2016 21:39 IST

पुणे विधान परिषद निवडणुकीसाठी माजी आमदार विलास लांडे यांनी अपक्ष अर्ज दाखल करून राष्टÑवादीसमोर अडचण निर्माण केली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार

ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 03 -  पुणे विधान परिषद निवडणुकीसाठी माजी आमदार विलास लांडे यांनी अपक्ष अर्ज दाखल करून राष्ट्रवादीसमोर अडचण निर्माण केली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शह देण्यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना मानणारा गट, तसेच शिवसेना, भाजपा व मनसेची मोट बांधून पाठिंबा मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
विधान परिषद निवडणुकीतील विलास लांडे यांच्या बंडखोरीने राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी झाली आहे. लांडे यांच्या उमेदवारीला चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचा पाठिंबा असल्याची चर्चाही शहरात रंगली आहे. लांडे-जगताप ही जोडगोळी अजित पवार यांना शह देणार असल्याची चर्चाही रंगली आहे. त्यासाठी राष्ट्रवादीतील नाराज नगरसेवक  आणि शिवसेना-भाजपातील सदस्यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी लांडे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. 
 
निवडणुकीत वेगळी समीकरणे...
राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल भोसले यांनी लांडे यांची भोसरीत येऊन आज भेट घेतली. अर्ज माघारी घेऊन पाठिंबा द्यावा, अशी विनंती केली. तसेच, लांडे यांनी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची भेट गुरुवारी भेट घेऊन शिवसेनेकडून पाठिंबा मिळविण्याची मागणी केली. लांडे यांनी थेट आढळरावांशी चर्चा केल्याने वेगळी समीकरणे उदयास येण्याची शक्यता आहे.  त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते व माजी महापौर आझम पानसरे यांचीही लांडे यांनी भेट घेतली. शिवाय शहरातील अन्य नेत्यांच्या भेटीवर लांडे यांनी भर दिला आहे. राष्ट्रवादीतील नाराज नगरसेवक, पदाधिकारी, शिवसेना, भाजपा, मनसेची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. येत्या शनिवारी माघारीचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर विधान परिषदेची लढत कशी असेल, हे सिद्ध होणार आहे. 
 
महापालिकेतील संख्याबळ..
राष्ट्रवादी काँग्रेसचे ८३, शिवसेना १४, काँग्रेसचे १३, भाजपाचे तीन, मनसेचे चार, अपक्ष दहा, आरपीआय गट एक असे एकूण १२८ नगरसेवक आहेत. त्यांपैकी जगताप गटाचे समर्थक २२, लांडे गटाचे समर्थक २० नगरसेवक आहेत. युती आणि आघाडीचा निर्णय काय होणार ? यावरही लढत अवलंबून असणार आहे.