शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
4
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
5
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
6
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
7
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
8
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
9
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
10
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
11
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
12
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
13
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
14
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
15
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
18
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
19
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
20
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

निवडणुकीनंतर शिवसेना-भाजप एकत्र येतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2017 02:14 IST

निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप हे होतच राहणार, पण भाजप-शिवसेना हे नैसर्गिक मित्रपक्ष असून निवडणुकीनंतरही हे पक्ष एकत्र येतील, असा विश्वास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

कोल्हापूर : निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप हे होतच राहणार, पण भाजप-शिवसेना हे नैसर्गिक मित्रपक्ष असून निवडणुकीनंतरही हे पक्ष एकत्र येतील, असा विश्वास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.कोल्हापुरात भाजप कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री पाटील म्हणाले, शिवसेना-भाजप हे एकाच विचाराचे व संस्कृतीचे आहेत. एकमेकांची वैचारिक दोस्ती असून वैचारिक अजेंडाही एकच आहे. त्यामुळे आता युती तुटली असली तरी दोन्ही पक्षांनी एकमेकांवर असे आरोप करू नयेत की पुन्हा एकत्र यायला संकोच होईल. पुन्हा एकत्र यायचे असल्यास दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आसूड ओढू नयेत. शिवसेना-भाजपचं सरकार पाच वर्षे राहणार असून शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही आणि राष्ट्रवादीची भाजपला गरजही भासणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपसोबत नसल्याचे आपल्याला दु:ख होतं आहे, असे असले तरी अजूनही खासदार राजू शेट्टी यांच्याशी आपली चर्चा सुरू आहे. मनसे आणि शिवसेना एकत्र आले तरी मुंबईत भाजप किमान ११५ जागा जिंकेल आणि महापौर भाजपचाच असणार आहे. लोकसभा, विधानसभा व नगरपालिका निवडणुकीतील यशानंतर जिल्हा परिषद व महानगरपालिका निवडणुकीत यश मिळाल्यावर हे यशाचे वर्तुळ पूर्ण होईल. निवडणुकांसाठी जुने-नवे कार्यकर्ते त्याचबरोबर पक्ष व अन्य पक्ष यांचा समतोल चांगल्या पद्धतीने साधण्यात यश मिळाले आहे. (प्रतिनिधी) लोकशाहीत कोणालाही बोलायला अधिकारजिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘शिवसेनेला जागा देणारे ‘दादा’ कोण ?’ अशी टीका चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर काही दिवसांपूर्वी शिवसेना नेत्यांकडून झाली होती. याबाबत विचारल्यावर चंद्रकांतदादांनी ‘लोकशाहीत कोणालाही बोलायला अधिकार असून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जर लोक बोलत असतील तर मी सर्वसामान्य माणूस आहे,’ असे उत्तर दिले.