शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर शिवसेनाही कनेक्ट

By admin | Updated: July 19, 2016 03:21 IST

लोकसभा आणि त्यापाठोपाठ झालेल्या विधानसभा तसेच कल्याण-डोंबिवली निवडणुकीत ज्या पद्धतीने भाजपाने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार केला

ठाणे : लोकसभा आणि त्यापाठोपाठ झालेल्या विधानसभा तसेच कल्याण-डोंबिवली निवडणुकीत ज्या पद्धतीने भाजपाने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार केला होता, त्याच धर्तीवर आता शिवसेनेने ठाण्यात भाजपाला शह देण्यासाठी सोशल मिडियाचा आधार घेण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार, आगामी निवडणुकीची रूपरेषा ठरवण्यासाठी तसेच आंदोलने, कार्यक्रम आदींची माहिती एका क्लिकवर स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यालादेखील मिळावी, म्हणून आतापासूनच शिवसेनेने हायटेक प्रचाराला सुरुवात केली आहे. यासाठी सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर चार प्रकारचे ग्रुप तयार करण्यात आले आहेत.येत्या काही महिन्यांत ठाणे महापालिका निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाणार आहे. या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा हे स्वतंत्र लढतील, अशी दाट शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच या दोन्ही पक्षांनी एकमेकांना शह देण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू केले आहेत. डोंबिवलीचे भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण यांची राज्यमंत्रीपदी वर्णी लावून त्यांच्या खांद्यावर ठाण्याची जबाबदारी टाकली जाणार आहे. चव्हाण यांना ठाण्याच्या राजकारणात उतरवून शिवसेनेचे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना शह देण्याचा यातून प्रयत्न होणार आहे. येत्या दिवाळीपूर्वी मेट्रोचे भूमिपूजन होणार असल्याने त्याचे श्रेय घेण्यासाठी भाजपा आतापासूनच सरसावली आहे. क्लस्टर असो अथवा इतर कोणत्याही चांगल्या कामांचे श्रेय असो, यासाठी शिवसेना आणि भाजपामध्ये चढाओढ लागली आहे.कल्याण-डोंबिवलीत भाजपाने ज्या पद्धतीने इतर पक्षांचे नगरसेवक फोडून शिवसेनेला कात्रजचा घाट दाखवण्याचा प्रयत्न केला होता, तसाच प्रयत्न आता ठाणे महापालिकेतही होणार आहे. त्यामुळे शिवसेना आधीपासूनच सावध झाली असून त्यांनी नुकतेच मनसेचे दोन नगरसेवक आपल्या दावणीला बांधले आहेत. तसेच येत्या काही काळात काँग्रेस- राष्ट्रवादीचेदेखील काही मातब्बर नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे येथे शिवसेनेने भाजपाला आधीच शह देण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेने सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर चार प्रकारचे ग्रुप तयार केले असून विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख आणि त्या सर्वांवर नियंत्रण ठेवणारा एक ग्रुप तयार केला आहे. यावर, महापौर संजय मोरे हे जातीने लक्ष ठेवणार असून मातोश्रीवर किंवा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आलेल्या प्रत्येक महत्त्वाच्या विषयांची चर्चा या ग्रुपच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी केली जाणार आहे.>पक्षाची बांधणी असो, इतर पक्षांतील कार्यकर्ते फोडण्याचे काम असो अथवा आंदोलने, कार्यक्रम आदी सर्वांची माहिती एका क्लिकवर प्रत्येक कार्यकर्त्याला या ग्रुपच्या माध्यमातून दिली जात आहे. एकूणच या माध्यमातून आता शिवसेनेने पक्षबांधणी आणि प्रचाराची मोर्चेबांधणी सुरू केल्याचे दिसत आहे.