शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

तेरणा शाळेवर शिवसेनेचीही धडक

By admin | Updated: June 29, 2016 02:16 IST

नेरूळमधील तेरणा शाळेतील फीवाढ व शैक्षणिक साहित्य शाळेतूनच घेण्याच्या सक्तीविरोधात शिवसेनेने आंदोलन केले.

नवी मुंबई : नेरूळमधील तेरणा शाळेतील फीवाढ व शैक्षणिक साहित्य शाळेतूनच घेण्याच्या सक्तीविरोधात शिवसेनेने आंदोलन केले. आंदोलनानंतर साहित्य शाळेतून घेण्याची सक्ती केली जाणार नसल्याचे व फी कमी करण्याचे आश्वासन व्यवस्थापनाने दिले आहे. शाळा व्यवस्थापनाने केलेली फीवाढ रद्द करावी यासाठी काही पालकांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांकडे धाव घेतली होती. यामुळे शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी आंदोलन करण्यात आले. शाळेबाहेर घोषणाबाजी करून व्यवस्थापनाच्या मनमानीचा निषेध करण्यात आला. पालकांना शाळा सुरू होण्यापूर्वी गणवेश व इतर साहित्यासाठी २५०० रुपये शुल्क सांगण्यात आले होते. परंतु त्यामध्ये अचानक वाढ केली आहे. शैक्षणिक शुल्कही अचानक वाढविले आहे. ही सर्व शुल्कवाढ कमी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती केली जाणार नसल्याचे आश्वासन यावेळी व्यवस्थापनाने दिले. याशिवाय मराठी माध्यमाची फी वाढविलेली नाही. मुलांसाठी जादा सुविधा दिल्या जाणार असून त्यासाठी शुल्क आकारले असल्याचे सांगितले. वाढीव फी काही प्रमाणात कमी केली जाणार असल्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. आंदोलनामध्ये बेलापूर मतदार संघाचे संपर्क प्रमुख विठ्ठल मोरे, मनोहर गायखे, रंजना शिंत्रे, विजय माने, काशिनाथ पवार, रतन मांडवे, रंगनाथ औटी, दिलीप घोडेकर, शिवाजी महाडिक, समीर बागवान व इतर पदाधिकारी उपस्थित होते.