शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
5
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
6
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
7
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
8
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
9
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
10
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
11
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
12
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
13
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
14
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
15
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
16
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
17
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
18
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
19
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
20
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...

संघटनात्मक बांधणीसाठी शिवसंपर्क मोहीम - उद्धव ठाकरे

By admin | Updated: May 7, 2017 04:29 IST

शिवसेना पक्ष संघटना बांधणीसाठी शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्रभर शिवसंपर्क मोहीम सुरू करण्यात आली असल्याची माहिती शिवसेना

लोकमत न्यूज नेटवर्कलोणावळा : शिवसेना पक्ष संघटना बांधणीसाठी शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्रभर शिवसंपर्क मोहीम सुरू करण्यात आली असल्याची माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. मोहिमेपूर्वी त्यांनी शनिवारी पत्नी रश्मी व पुत्र युवासेना प्रमुख आदित्य यांच्या समवेत लोणावळ्याजवळील कुलस्वामीनी आई एकवीरा देवीच्या मंदिरात येऊन दर्शन व आशीर्वाद घेतला. या वेळी देवीची विधिवत ओटी भरत देवीला सोन्याचा राणीहार व नथीचे अर्पण रश्मी ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान ही पूर्णपणे संघटनात्मक बांधणी मोहीम आहे. या अभियानाविषयी काही गैरसमज पसरविले जात आहेत. मात्र, या मोहिमेत शेतकरी वा जनता यांच्याशी संपर्क साधण्याबाबत अद्याप विचार केलेला नसून ग्रामीण भागात खेडोपाडी काम करणारे शिवसैनिक यांच्याशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी समजावून घेत पक्ष बांधणी करण्यासाठी हे अभियान घेण्यात आले आहे. या वेळी श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे, शिवसेना जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, खासदार श्रीरंग बारणे, मुंबईचे महापौर प्रा. विश्वनाथ महाडेश्वर, उपमहापौर हेमांगी वरळीकर, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर, सभागृहनेते यशवंत जाधव, ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे, उपमहापौर रमाकांत मडगी, शिवसेना मावळ तालुकाप्रमुख राजू खांडभोर, उपतालुकाप्रमुख सुरेश गायकवाड, भारत ठाकूर, बबन खरात, गणपत पडवळ, मधुकर पडवळ, अनिकेत घुले, नगरसेवक शादान चौधरी, सुनील इंगूळकर, नितीन आगरवाल, माणिक मराठे, विशाल हुलावळे उपस्थित होते.आज मराठवाड्यातजवळपास तीन ते चार वर्षांनी हे अभियान राबविण्यात आले असून रविवारी (दि. ७) मी याकरिता मराठवाड्यात जाणार आहे. ठाणे व मुंबई महापालिकेत सत्ता आल्यानंतर दोन्ही ठिकाणचे महापौर व उपमहापौर यांना घेऊन आज दर्शनाला आलो आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.