शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

शिवस्मारकाचा वाद हरित न्यायाधिकरणात

By admin | Updated: September 1, 2016 21:56 IST

अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्याच्या प्रकल्पाचा वाद आता राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात पोहोचला आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 1 - अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्याच्या प्रकल्पाचा वाद आता राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात पोहोचला आहे. न्यायाधिकरणाने याप्रकरणी याचिका दाखल करून घेत राज्य आणि केंद्र शासनाच्या एकूण सात विभागांना खुलासा करण्याच्या नोटिसा धाडल्या आहेत. याचिकाकर्त्यांचे वकील अ‍ॅड. असीम सरोदे यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.सरोदे म्हणाले की, या प्रकल्पासाठी आवश्यक पर्यावरण खात्याच्या ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी राजकीय हस्तक्षेप झाला आहे. त्यामुळे येथील जैवविविधता धोक्यात आल्याचा युक्तिवाद याचिका दाखल करताना केला आहे. त्यावर राज्य आणि केंद्र सरकारला याबाबत खुलासा करण्याचे आदेश न्यायाधिकरणाने दिले आहेत. याबाबत न्यायमूर्ती डॉ. अजय देशपांडे आणिन्यायमूर्ती जावेद रहीम यांच्या खंडपीठासमोर ३० सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. सरकारने बेकायदेशीररित्या परवानग्य मिळवल्या असून त्या रद्द करण्याची मागणी याचिकेत केली आहे. शिवाय सर्व परवानग्या नव्याने देताना तज्ज्ञ समिती नेमण्याची मागणीही याचिकाकर्त्यांनी केली आहे.सरकारने पर्यावरण विभागाकडे सादर केलेल्या अहवालात याठिकाणी मासेमारी होत नसल्याचे स्पष्ट केले आहे. याउलट याठिकाणी लॉब्स्टर प्रजातीचा मासा मिळत असून बाजारात त्याला चांगली मागणी आहे. याशिवाय शेकडो डॉल्फीन याठिकाणीपाहायला मिळतात. महत्त्वाची बाब म्हणजे ४० प्रकारचे खेकडे हे येथील जैवविविधतेचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे प्रकल्प याठिकाणी राबवल्यास नक्कीच ही वैविधताही नष्ट होईल, अशी शक्यता याचिकाकर्ते व पर्यावरण संवर्धक प्रदिप पाताडे यांनी व्यक्त केली.......................स्मारकाला नव्हे, तर जागेला विरोधयाचिकाकर्ते आणि मच्छीमार समाजाचे नेते दामोदर तांडेल यांनी शिवस्मारकाला नव्हे, तर शिवस्मारक उभाण्यात येणाऱ्या जागेला विरोध करत असल्याचे सांगितले. अरबी समुद्रातील खडकाळ जागेला बेट सांगून शासन पर्यावरण खात्याची फसवणूक करत आहे. याठिकाणी कोणतेही खोदकाम होणार नाही, असा युक्तीवाद सरकारने केला आहे. मात्र बांधकाम केल्याशिवाय स्मारक अशक्य आहे. मुळात बांधकामासाठी आवश्यक पाण्यासाठीच सरकारला याठिकाणी पाईपलाईन घेऊन यावी लागणार आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्याऐवजी महालक्ष्मी रेसकोर्स येथे स्मारक उभारण्याचा पर्याय तांडेल यांनी सुचविलाआहे.