शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

भेसळयुक्त दूधविक्री प्रकरणी भंडाराचे माजी खासदार शिशुपाल पटलेंसह पाच जणांना शिक्षा

By admin | Updated: August 26, 2016 19:28 IST

भेसळयुक्त दूधाचे उत्पादन व विक्री केल्याप्रकरणी भंडाराचे माजी खासदार शिशुपाल पटले व त्यांच्या पत्नीसह पाच आरोपींना एक वर्षाचा सश्रम करावास व एक हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.

ऑनलाइन लोकमत
वर्धा, दि. 26 -  भेसळयुक्त दूधाचे उत्पादन व विक्री केल्याप्रकरणी भंडाराचे माजी खासदार शिशुपाल पटले व त्यांच्या पत्नीसह पाच आरोपींना एक वर्षाचा सश्रम करावास व एक हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास आणखी एका महिना साध्या कारावासाचे प्रावधान आहे. हा निकाल येथील मुख्य न्यायदंडाधिकारी एस.एन. माने-गाडेकर यांनी खुल्या न्यायालयात शुक्रवारी सुनावला.
अन्न भेसळ प्रतिबंधित कायदा १९५४ अंतर्गत तत्कालीन अन्न निरीक्षक सं.भा. नारागुडे यांनी वर्धेतील मे. राजेंद्र दूध डेअरी या पेढीस अचानक भेट दिली. दरम्यान राजेंद्र भुराजी अवथळे याच्याकडून मे. पवन मिल्क अ‍ॅन्ड फुड प्रोडक्टस, तुमसर रोड, भंडारा यांच्याद्वारा उत्पादित ‘केशर गाय का
दूध’ या अन्नपदार्थाचा नमुना दि. ०२ आॅक्टोबर २००८ रोजी भेसळीच्या संशयावरून विश्लेषणाकरिता घेण्यात आला होता. सदर नमुना विश्लेषणाअंती कायद्याने ठरवून दिलेल्या गाईच्या दूधाच्या मानदापेक्षा कमी मानदाचे
अर्थात अप्रमाणित घोषित झाला होता. या आधारे सदर प्रकरणाचा संपूर्ण तपास
व चौकशी तत्कालीन अन्न निरीक्षकाने करून प्रकरण जानेवारी २००९ मध्ये येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात न्यायप्रविष्ट केले
होते. सदर प्रकरणी भेसळयुक्त दूधाची विक्री केल्याप्रकरणी वर्धेतील मे. राजेंद्र दूध डेअरीचे राजेंद्र भुराजी अवथळे याला आरोपी करण्यात आले
होते. तसेच सदर दूधाचे उत्पादक मे. पवन मिल्क अ‍ॅन्ड फुड प्रोडक्टस, एस.आय.डी.सी. तुमसर रोड, ता. तुमसर, जि. भंडारा हे असल्यामुळे सदर पेढीचे सर्व मालक व भागीदार शिशुपाल नत्थूजी पटले, दूर्गाप्रसाद शंकरलाल पटले,
सुमन दूर्गादास पटले, शिल्पा शिशुपाल पटले यांना भेसळयुक्त दुधाची उत्पादन व विक्रीप्रकरणी आरोपी करण्यात आले होते.
याप्रकरणी साक्ष पुरावे नोंदविण्यात आले होते. आरोपी व शासनाच्यावतीने युक्तिवाद करण्यात आला. यात उपरोक्त आरोपींनी भेसळयुक्त दूधाचे उत्पादन व विक्री केल्याचे निष्पन्न झाले. जनहित व जनआरोग्याचा विचार तसेच अशा प्रवृत्तीला आळा घालण्याच्या दृष्टीने मुख्य न्यायदंडाधिकारी एस. एन.
माने-गाडेकर यांनी आरोपी राजेंद्र भुराजी अवथळे याला भेसळयुक्त दुधाची विक्रीप्रकरणी सहा महिने सश्रम करावासाची शिक्षा व एक हजार रूपयांचा दंड आणि दंड न भरल्यास आणखी एक महिना साध्या करावासाची शिक्षा ठोठावली. सदर दूधाचे उत्पादक आरोपी सर्व मालक व भागीदार शिशुपाल नत्थूजी पटले, दुर्गाप्रसाद शंकरालाल पटले, सुमन दुर्गाप्रसाद पटले व शिल्पा शिशुपाल पटले यांना भेसळयुक्त दूधाचे उत्पादन व विक्री केल्याप्रकरणी प्रत्येकी
एक वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा आणि प्रत्येकी एक हजार रूपयांचा दंड आणि दंड न भरल्यास, प्रत्येकी एक महिन्याची साध्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.
शासनाच्या वतीने सहायक सरकारी अभियोक्ता एस.डी. स्थुल यांनी युक्तिवाद केला. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे कार्यरत अन्न सुरक्षा अधिकारी रवीराज धाबर्डे यांच्यामार्फत योग्य पाठपुरावा करण्यात आला. सदरची कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (अन्न) ज.रा. वाणे यांचे
मार्गदर्शनाखाली करण्यात आली. भेसळयुक्त दूधाचे उत्पादन, साठवणूक व
विक्री होत असल्याचे आढळल्यास यापुढेही अशीच कठोर कारवाई करण्यात येईल,
असे आवाहन नागपूर विभागाचे सह आयुक्त (अन्न) केकरे यांनी केले आहे.⁠⁠⁠⁠