शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
3
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
4
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
5
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
6
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
7
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
8
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
9
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
10
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
11
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
12
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
13
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
14
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
15
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
16
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
17
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
18
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
19
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
20
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव

शिर्डीत शतकोत्तर गुरूपौर्णिमा उत्साहात

By admin | Updated: July 13, 2014 01:35 IST

शिर्डीतील शतकोत्तरी गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर शनिवारी लाखो भाविकांनी साईदरबारी हजेरी लावत साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले.

शिर्डी (जि़ अहमदनगर) : शिर्डीतील शतकोत्तरी गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर शनिवारी लाखो भाविकांनी साईदरबारी हजेरी लावत साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले. विशेष म्हणजे पहाटे मंदिर उघडण्यापूर्वीच भाविकांच्या रांगा शहराबाहेर पोहोचल्या होत्या़
द्वारकामाईत शुक्रवारपासून सुरू असलेल्या साईसच्चरित्र ग्रंथ पारायणाची सकाळी सांगता झाली़ यानिमित्ताने साईप्रतिमा व साईसच्चरित्र ग्रंथाची द्वारकामाई मंदिरातून मिरवणूक काढण्यात आली़ ही मिरवणूक गुरूस्थान मंदिरात व तेथून समाधी मंदिरात नेण्यात आली़ माध्यान्ह आरतीला कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सपत्नीक हजेरी लावली़
दुपारी ह़भ़प़ माधवराव आजेगावकर (परभणी) यांच्या कीर्तनाचा, तर रात्री विजय साखरकर (मुंबई) यांचा साईंच्या गाण्यांवर आधारित नृत्यमय कार्यक्रम झाला़ रात्री सव्वानऊ वाजता श्रींच्या सुवर्ण रथाची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली़ यात मोठय़ा प्रमाणावर भाविक व ग्रामस्थांबरोबरच अनेक बॅण्ड पथके सहभागी झाली़़ उत्सवाच्या निमित्ताने भाविकांच्या देणगीतून मंदिर व परिसरात फुलांची सजावट करण्यात आली़ भाविकांच्याच देणगीतून तीनही दिवस मोफत अन्नदान होत आह़े पहिल्या दिवशी सत्तर हजार भाविकांनी मोफत प्रसाद भोजनाचा लाभ घेतला, तर 8क् भाविकांनी रक्तदान केले. (प्रतिनिधी)
 
‘त्या’ निर्णयावर नाराजी
उत्सव काळात केवळ संस्थानचे पदाधिकारी व अधिकारी यांचेच वस्त्र मूर्तीवर चढवण्याच्या निर्णयावर संस्थानचे माजी विश्वस्त डॉ़ एकनाथ गोंदकर यांनी आक्षेप घेत हा सामान्य भाविकांवर अन्याय असल्याचे सांगितल़े सकाळच्या ग्रंथ मिरवणुकीच्या वेळी बराच वेळ मंदिर विनाकारण निर्मनुष्य ठेवण्यात आल्याबद्दलही गोंदकर यांनी नाराजी व्यक्त केली़ दर्शनबारीत पाच ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती, मात्र ती अगदीच तोकडी ठरली. शहरात दूरवर गेलेल्या रांगांमुळे भाविकांना त्रस सहन करावा लागला़