शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

शिर्डी विमानतळाच्या धावपट्टीला ८ कोटींची मलमपट्टी!

By admin | Updated: December 24, 2016 22:40 IST

शिर्डी विमानतळाच्या धावपट्टीला आठ कोटींची मलमपट्टी करण्याची वेळ महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीवर आली.

 ऑनलाइन लोकमत 

शिर्डी, दि. 24 -  हौशी वाहनचालकांनी धावपट्टीवर वाहने पळविल्याने विमान उड्डाणाच्या आधीच शिर्डी विमानतळाच्या धावपट्टीला आठ कोटींची मलमपट्टी करण्याची वेळ महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीवर आली. त्यामुळे उड्डाणही लांबणीवर पडला. गेल्या अनेक वर्षांपासून शिर्डी विमानतळाचे काम सुरू आहे़ अडीच किमी लांब व ४५ मीटर रुंदीची भव्य धावपट्टी जवळपास तीन वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेली आहे.

मात्र भूसंपादनाचे काही विषय रेंगाळल्याने व कंपाउंडचे काम अर्धवट राहिल्याने धावपट्टी बेवारस पडली़ अनेकांनी दुचाकी व चारचाकी वाहन चालवण्याचे प्रशिक्षण घेतले, याच धावपट्टीवर तरुणांनी मोटारसायकलचे स्टंट अनुभवले, तर काही बेवड्यांनी येथे चक्कपार्ट्या करून हवाई सफर केली़संगमनेरलामधल्या रस्त्याने जाणारे थेट या धावपट्टी वरूनच जात़ विमानाचा स्वर्गीय स्पर्श अनुभवण्यापूर्वी या धावपट्टींच्या नशिबी मोटारसायकल, रिक्षा, टेम्पोपासून बैलगाडीची वहिवाट आली़ त्यातच यंदा वरूणराजानेही या दुष्काळी टापूवर मेहरनजर केली़ यामुळे या धावपट्टीचा पृष्ठभाग खडबडीत झाला व अनेक ठिकाणी खडी उखडून खड्डेही पडले.

विमानतळ सुरू करण्यासाठी एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी विमानतळाच्या केलेल्या पाहणीत उखडलेल्या धावपट्टीवर आक्षेप घेत एखादा खडा उडाला, तरी आम्हाला कोट्यवधींचा भुर्दंड बसेल, असे सांगितले़ यामुळे आता या धावपट्टीच्या दुरुस्तीसाठी आठ कोटींचे टेंडर काढण्यात आले असून, रात्रंदिवस रिकोटिंगचे काम सुरू आहे़ त्याचबरोबर टर्मिनलचेही विस्तारीकरण, इलेक्ट्रिफिकेशन, फायर फायटिंगचे काम अंतिम टप्प्यात आहे़जानेवारीत विमानाच्या उड्डाणाची शक्यता१५ जानेवारीपर्यंत ही सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचना विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व कार्यकारी संचालक विश्वास पाटील यांनी दिल्याचे कार्यकारी अभियंता रजनी लोणारे व अभियंता अमर खोत यांनी सांगितले़ विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदींना आणण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न आहे़ जानेवारीत हा विमानतळ रण होण्याची शक्यता असून, कामाची निकड लक्षात घेऊन, रजनी लोणारे यांना नागपुरहून येथे आणण्यात आले आहे़