सोलापूर : सुशीलकुमार शिंदे यांनी आजवर जनतेसाठी बरेच काही केले. त्यांची राजकारणातील ही झेप साधी, सोपी नाही. ते आज आपला अमृतमहोत्सवी वाढदिवस साजरा करीत आहेत. आता त्यांनी थोडंसं स्वत:साठी जगावं. स्वत:साठी आनंद शोधावा, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेता भरत जाधव यांनी केले.अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या सोलापूर जिल्ह्यातील शाखांच्या वतीने शिंदे यां्रऊ अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त भरत जाधव यांच्या हस्ते सत्कार झाला, त्यावेळी भरत जाधव म्हणाले की, सुशीलकुमार यांनी ७५ वर्षांच्या जीवनकालात जनतेच्या हितासाठी बरेच कार्य केले. ‘केल्याने होत आहे रे’ याचे उत्तम उदाहरण शिंदेसाहेब आहेत. ते आपल्या सोबत आहेत. त्यामुळे सोलापूरकरांना मी नशीबवान समजतो. सत्काराला उत्तर देताना शिंदे यांनी डॉ. जब्बार पटेल यांच्याबरोबरच्या नाट्यप्रवासाला उजाळा दिला. राजकीय माणूस हा सुद्धा एक कलाकार असतो, असे ते म्हणाले.
शिंदेसाहेब, आता स्वत:साठीही जगा
By admin | Updated: September 13, 2016 05:51 IST