शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

शिल्पग्रामला उर्जितावस्थेची गरज

By admin | Updated: April 4, 2015 00:10 IST

प्रकल्प बंद असल्यामुळे पर्यटकांची पाठ सावंतवाडीच्या समस्या

प्रसन्न राणे - सावंतवाडी  विदेशातील पर्यटकांनी केलेल्या सफरीतील आकर्षण असलेल्या सावंतवाडीतील शिल्पग्राम या पर्यटनस्थळाचा आनंद अनेकवेळा जिल्ह्यासह विदेशातील पर्यटकांनी लुटला आहे. मात्र, हे स्थळ मागील काही वर्षांपासून बंदावस्थेत असल्याने या स्थळाचे आकर्षण नष्ट होताना दिसत आहे. प्रशासनाने या स्थळाच्या सांैदर्याला पुन्हा नवीन झळाळी देत प्रकल्प सुरू करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाच्या माध्यमातून साडेतीन कोटी रुपये खर्च करून शिल्पग्राम प्रकल्प उभारण्यात आला आहे. विविध चित्ररथ, फिल्म सिनेमागृह, पर्यटकांना राहण्यासाठी घरे, तंबू, तलाव, रेस्टॉरंट, हॉल अशा प्रकारच्या अनेक सोयीसुविधा या शिल्पग्राममध्ये पर्यटन विकास मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आल्या आहेत. मध्यंतरीच्या काळात या ठिकाणी दुर्लक्ष झाल्याने शिल्पग्राममधील काही सामानाची नासधूस झाली आहे. पर्यटकांना राहण्यासाठी उभारलेल्या घरातील सामानाची चोरी तसेच काही सामानाची तोडफोडही झाली होती. यानंतर या ठिकाणी सावंतवाडी नगर परिषदेने हा परिसर स्वच्छ करून ठेवल्याचे दिसून येत आहे. याठिकाणी पर्यटनदृष्ट्या कोणताही उपक्रम राबविण्यात आल्याचे दिसून येत नाही. सावंतवाडीत अनेक पर्यटन स्थळे आहेत. या सर्वांची पाहणी करून शिल्पग्राममध्ये उत्तम अशी पर्यटकांसाठी राहण्याची व अन्य सेवासुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, आता या बंद सुविधा सुरू करणे आवश्यक आहे. शिल्पग्राममध्ये या अगोदर अनेक पर्यटकांचा प्रतिसाद लाभला आहे. देश-विदेशातून अनेकवेळा शिल्पग्रामात पर्यटक आनंदोत्सव साजरा करून गेलेले आहेत. सावंतवाडी नगरपरिषदेने या अगोदर लाखो रुपये खर्च करून तीन वेळा विदेशी पर्यटकांचे आयोजनही केले होते. दरम्यान, अनेक स्थानिक नागरिकांनीही या शिल्पग्रामचा आस्वाद घेतला होता. मात्र, त्यानंतरच्या काळात शिल्पग्रामात प्रवेश बंद केल्याने आजपर्यंत शिल्पग्राम त्याच स्थितीत आहे.शिल्पग्राम इच्छुक एजन्सीकडे देणारशिल्पग्राम येणाऱ्या पर्यटकांसाठी अगोदरपासूनच सुरू आहे. मात्र, त्यांच्याकरिता बांधण्यात आलेली घरे एजंटअभावी बंद ठेवण्यात आली होती. मात्र, ही घरे पुन्हा दुरुस्त करून इच्छुक एजन्सीकडे देण्याचा मानस आहे. याकरिता काही एजंटशी बोलणे झाले असून येत्या सहा महिन्यात शिल्पग्राम पूर्ववत बनविण्यात येणार आहे. - बबन साळगावकर, नगराध्यक्ष, सावंतवाडीप्रकल्प शुल्क सर्वसामान्यांना परवडणारे व्हावेसावंतवाडी शहरात शासन मान्यतेनुसार मोठे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. मात्र, शासनाने सामान्य जनतेला परवडणारे शुल्क लावले पाहिजे तरच याचा विकास होईल. शिल्पग्रामसह शहरातील सर्व प्रकल्पांची प्रसिद्धी होणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणात लादलेले शुल्क कमी करुन स्थानिकांना प्रकल्प चालविण्यास परवडेल असे शुल्क ठेवले पाहिजे. प्रकल्प करुन झाल्यास गोवा, कर्नाटक येथील पर्यटकांना याचा फायदा होणार आहे.- गोविंद वाडकर, नगरसेवक, सावंतवाडी