शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शेट्टींची आत्मक्लेश यात्रा? ही तर सदाभाऊ क्लेश यात्रा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2017 23:04 IST

शेट्टींची आत्मक्लेश यात्रा?ही तर सदाभाऊ क्लेश यात्रा!

लोकमत न्यूज नेटवर्ककऱ्हाड : खासदार राजू शेट्टी यांनी काढलेली आत्मक्लेष यात्रा ही शेतकऱ्यांसाठी नव्हती. ती तर मला त्रास देण्यासाठी काढलेली ‘सदाभाऊ क्लेष’ यात्रा होती, असा टोला राज्याचे कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना लगावला.कऱ्हाड येथे आढावा बैठकीसाठी उपस्थित असणाऱ्या मंत्री खोत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांची यावेळी उपस्थिती होती.मंत्री खोत म्हणाले, खरंतर चळवळीत योगदान नसणाऱ्या लोकांनी शेतकरी संघटनेतील वातावरण गढूळ केले आहे. मी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून सरकारमध्ये सहभागी असल्याने मी शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेऊन काम करीत आहे. त्यामुळे शेतकरी समाधानी आहेत. पण काहींच्या मते मी त्यांना डोळ्यासमोर ठेऊन काम करायला हवे. तसे मी करीत नसल्याने ते नाराज आहेत. त्याला मी काय करणार, अशी कोपरखळी त्यांनी खासदार शेट्टी यांना मारली. नुकतीच पुणे येथे झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत तुमच्याबाबत अनेकांनी तक्रारी केल्या. तुम्हाला ४ जुलैपर्यंत मत मांडण्याचा अल्टिमेटम दिलाय, असे छेडले असता खोत म्हणाले, मी तुमच्या वृत्तपत्रातून ही बातमी वाचली आहे. ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होती. पण मी संघटनेचा सर्वसामान्य कार्यकर्ता असल्याने मला बैठकीला बोलविले नसेल. मी उत्तर द्यायला, मत मांडायला तयार आहे. समितीचे लोक माझ्याकडे आले तर ठिक. नाहीतर ते बोलवतील त्याठिकाणी मी जायला तयार आहे.मी सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करीत असल्याने मी गोपनियतेची शपथ घेतली आहे. त्यामुळे मला चौकटीत राहुनच काम करावे लागते. मी शरद जोशींच्या विचार सरणीतून तयार झालेला कार्यकर्ता आहे. त्यामुळे कृषीमंत्री म्हणून काम करताना शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. ऊस खरेदी कर माफ करणे, बाजार समिती निवडणुकीत थेट शेतकऱ्याला मतदानाचा हक्क देणे अशा अनेक निर्णयाबरोबर शेतकरी कर्जमाफीमध्ये मी महत्वाची भुमिका बजावली आहे. त्यामुळे विरोधक काहीही टीकाकरीत असले तरी त्याला मी महत्व देत नाही.सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी...विदर्भ मराठवाड्यात पाऊस नाही. तेथील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. याबाबत विचारले असता सदाभाऊ खोत म्हणाले, याबाबत त्या-त्या जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविण्यात आला आहे. अहवाल प्राप्त होताच योग्य तो निर्णय घेतला जाईल. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. त्यांच्या हिताचेच निर्णय घेतले जातील, असेही यावेळी सदभाऊ खोत म्हणाले.