शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

शेट्टी-खोत यांच्यातील ‘स्वाभिमान’ चिघळला

By admin | Updated: March 4, 2017 05:18 IST

राजू शेट्टी आणि कृषि-पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यामधे ‘स्वाभिमाना’ची मोठी भिंतच उभी राहिल्याचे शुक्रवारी दिसून आले

पुणे : ‘माझा दोस्त’अशी एकमेकांना आपुलकीची हाक मारणारे स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि कृषि-पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यामधे ‘स्वाभिमाना’ची मोठी भिंतच उभी राहिल्याचे शुक्रवारी दिसून आले. शेट्टी नवीन शासकीय विश्रामगृहात उतरल्याचे समजल्यावर तेथे आलेल्या खोत यांनी आपला मोर्चा पाणीपुरवठा विभागाच्या विश्रामगृहाकडे वळविला व तेथेच मुक्काम करणे पसंद केले. सदाभाऊ ंना लाल दिवा मिळाल्यापासून दोघांमध्ये सुरू झालेला दुरावा कमी होण्याऐवजी अजूनही धुमसतोयच, हेच यावरुन स्पष्ट झाले. या विसंवादीपणामुळे स्वाभिमानीची शकले होणार की, काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ््याच्या जलावरण सोहळ््यापासून सुरु झालेले दोघांमधील खटके वाढतच आहेत. खोत यांच्या मुलाच्या लग्नात झालेला खर्चावर नाक मुरडणे सुरू असतानाच शेट्टींचा सल्ला धुडकावत सदाभाऊंनी मुलाला जिल्हा परिषद निवडणुकीत उतरविले. त्यानंतर दोघांमधील ताण आणखी वाढला. त्यातच निकालानंतर शेट्टींनी विरोधात काम केल्यामुळेच सदाभाऊंच्या मुलाचा पराभव झाल्याची चर्चा जोर धरु लागली. त्यानंतर दोघांमधील वाक्युद्धही चांगलेच रंगले. शेट्टींनी...तुमचे अस्तित्व कुणामुळे आहे, हे बजावले. तर सदाभाऊंनी गोफण बाहेर काढली. तेव्हापासून दोन दिशेला झालेली या दोघांची तोंडे एकमेकांसमोर येण्याचे टाळतच आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत लढलेल्या कार्यकर्त्यांशी शेट्टी यांनी शुक्रवारी संवाद साधला. त्यासाठी ते पहाटे तीन वाजता कॅम्प येथील नवीन शासकीय विश्रामगृहात उतरले होते. याची माहिती कळताच खोत यांनी शासकीय विश्रामगृहावर जाणे टाळले. वास्तविक येथेच त्यांनी सदनिकाही आरक्षित केली होती. मात्र, त्या ऐवजी पाणी पुरवठा विभागाच्या विश्रामगृहावर जाऊन त्यांनी विश्रांती घेतली. याबाबत विचारले असता, आमच्यात फार अंतर नाही, असे खोत यांनी सांगितले. मात्र,याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले नाही. आमच्यात किती अंतर आहे, हे किलोमीटरच्या मोजपट्टीत मोजले नसल्याचेही सदाभाऊ त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>कदाचित पक्षाच्या कार्यकर्त्यांना जागा कमी पडू नये, या साठी बहुदा ते कार्यक्रमाला आले नसावेत. त्यांचा आजचा कार्यक्रम मला माहीत नव्हता. ते आमच्या पक्षाचे मंत्री आहेत. राज्याच्या महत्त्वाच्या बैठका असल्याने त्यांना तेथेही असणे गरजेचे होते. निवडणुकानंतर ते चार-पाच दिवस देशाबाहेर गेले होते. त्यामुळे आमची भेट झाली नाही. मात्र, आमचे बोलणे होत असते, आम्ही लवकरच भेटू. - खा. राजू शेट्टी, अध्यक्ष- स्वाभीमानी शेतकरी संघटना