शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

शेलारांचे विधान हास्यास्पद - अहिर

By admin | Updated: September 20, 2016 04:20 IST

मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून शरद पवार राजकारणात आहेत.

मुंबई : मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून शरद पवार राजकारणात आहेत. त्यामुळे मराठा आंदोलनाबाबत पवारांनी केलेल्या भाष्यावर शेलारांसारख्या कालच्या नेत्यांनी प्रतिक्रीया देणे हास्यास्पद आहे. आपण कुणाबद्दल बोलतोय आणि काय बोलतोय याबाबात शेलारांनी तारतम्य बाळगायला हवे, अशी टीका राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केली. शेलार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात केलेल्या विधानाचा सोमवारी मुंबई राष्ट्रवादीने तीव्र निषेध केला. राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाबाहेर पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी शेलार यांच्या प्रतिमेचे दहन केले. शरद पवार यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय प्रवासात राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय स्तरावर आपल्या नावाचा वेगळा ठसा उमटविला आहे. पवारांसारख्या मार्गदर्शक नेतृत्वावर शेलारांसारख्या गल्लीबोळातील नेत्यांनी केलेल्या टीकेकडे खरे तर दुर्लक्ष करणेच योग्य आहे. शरद पवारांबद्दल देशभरातील मान्यवर आणि ज्येष्ठ नेते आदराने बोलतात. खुद्द भाजपाचेच वरिष्ठ नेते शरद पवारांकडे मार्गदर्शक म्हणून पाहतात. त्यामुळे शेलारांच्या या वक्तव्याबाबत भाजप नेतृत्वानेच त्यांना योग्य ती समज द्यावी. अन्यथा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांना योग्य वेळी समज देतील, असा इशारा सचिन अहिर यांनी दिला. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी सरकारवर निशाणा साधला होता. त्यास उत्तर देताना, या समाजातील अस्वस्थतेची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी सर्व विषयांवर चर्चेची दारे खुली केली आहेत. पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी यात राजकीय लुडबुड करू नये, असा शेरा शेलार यांनी मारला होता. (प्रतिनिधी)