शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘एमसीए’च्या अध्यक्षपदी शेलार

By admin | Updated: January 13, 2017 03:56 IST

जेष्ठ नेते शरद पवार यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अध्यक्षपदी

मुंबई : जेष्ठ नेते शरद पवार यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अध्यक्षपदी उपाध्यक्ष आशिष शेलार यांची एकमताने निवड झाली. त्याचवेळी विनोद देशपांडे आणि पंकज ठाकूर या समिती सदस्यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. लोढा समितीने सुचविलेल्या शिफारशी मान्य करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) सुनावताना अनुराग ठाकूर व अजय शिर्के यांची अनुक्रमे अध्यक्ष व सचिवपदावरुन उचलबांगडी केली. या निर्णयानंतर बीसीसीआयशी संलंग्न सर्वच राज्य संघटनांचे धाबे दणाणले होते आणि लोढा शिफारशीनुसार जे-जे पदाधिकारी नियमबाह्य ठरत होते त्यांच्या राजीनाम्याचे सत्र सुरु झाले होते. लोढा शिफारशीनुसार ७० वर्षांहून अधिक वयाची व्यक्ती क्रिकेट प्रशासक म्हणून कोणत्याही पदावर कार्यरत राहू शकत नव्हती. यानुसार पवार यांना प्रशासकाच्या मैदानातून बाहेर पडणे अनिवार्य होते आणि नुकताच १७ डिसेंबरला त्यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामाही दिला होता. विशेष म्हणजे यानंतर काही दिवसांनीच उपाध्यक्ष व भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे दोनपैकी एक उपाध्यक्षपद रिकामी झाले होते. तर अध्यक्षपदही रिक्त झाले होते.गुरुवारी एमसीएच्या झालेल्या बैठकीत शेलार यांची अध्यक्षपदी एकमताने निवड करतानाच उपाध्यक्षपदाच्या दोन्ही रिक्त जागेवर अनुक्रमे विनोद देशपांडे आणि पंकज ठाकूर यांची निवड करण्यात आली. या बैठकीनंतर एमसीएचे संयुक्त सचिव उन्मेश खानविलकर यांनी सांगितले की, ‘एमसीएमधील रिक्त झालेल्या महत्त्वांच्या पदांवर आम्ही नेमणूक केली असून पवार यांच्यानंतर रिक्त झालेल्या अध्यक्षपदी आशिष शेलार यांची निवड करण्यात आली आहे. तर, विनोद देशपांडे आणि पंकज ठाकूर हे दोन नवे उपाध्यक्ष असतील. हे सर्व पद पुढील निवडणूकांपर्यंत कायम राहतील. आम्हाला हे निर्णय घेऊन याची माहिती बीसीसीआयला द्यायची होती.’लोढा शिफारशीनुसार एमसीएच्या नियमांमध्ये सुधारणा करण्याबाबत खानविलकर म्हणाले की, ‘या कामाची प्रक्रीया सुरु झाली आहे. एमसीए नियमांमध्ये सुधारणा करण्याऱ्या समितीचे काम संपल्यानंतर लगेच विशेष सर्वसाधरण सभा बोलविण्यात येईल. त्यावेळी आम्ही आमचे नियम बदलू.’ (क्रीडा प्रतिनिधी)मिळालेली जबाबदारी पार पाडणारउपनगरामध्ये क्रिकेटचा अधिक प्रसार करण्याचा प्रयत्न करणार. येथील नवोदित क्रिकेटपटूंना अधिक प्रयत्न मिळवून देण्यासाठी काम करायचे आहे, असे एमसीएचे उपाध्यक्ष पंकज ठाकूर यांनी सांगितले.सर्व कार्यकारणी समितीच्या उपस्थितीत झालेल्या निर्णयाचा आनंद आहे. आता याापुढील तीन महिन्यांमध्ये शिल्लक असलेली कामे पुर्ण करण्यावर आमची प्राथमिकता असल्याचे मत एमसीएचे उपाध्यक्ष विनोद देशपांडे यांनी नोंदविले.