शेगाव (जि. बुलडाणा), दि. ४ : येथील म्हशीचे व्यावसायीक कमल पांडे यांचा रविवारी उत्तर प्रदेश येथील त्यांच्या मुळगांवी निघरुण खून करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. संपत्तीच्या वादातून सदर खून झाल्याचे समजते. शेगाव शहरातील बालाजी फैलामधील रहिवासी कमल पांडे यांचे उत्तरप्रदेश येथील सुस्तानपूर जवळ लंबुवा हे मूळ गांव आहे. त्यांची वडिलोपार्जित मालमत्ता तेथे होती. मात्र अनेक वर्षांपासून ते शेगावलाच स्थायीक झाले होते. ८ दिवसांपूर्वी ते आपल्या १४ एकर शेती मशागतीसाठी उत्तर प्रदेशात गेले होते. रविवारी ते शेतात गेले असता नातेवाइकांसोबत वाद होवून कमल पांडे यांचा खून झाला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांचे कुटूंबीय व राजू तिवारी हे उत्तर प्रदेशकडे रवाना झाले. कमल पांडे यांच्या खुनाची बातमी शहरात पसरताच नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे.
शेगावातील व्यापा-याचा उत्तर प्रदेशात खून
By admin | Updated: September 5, 2016 00:51 IST